Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
1005 - Telegram Web
Telegram Web
♦️मराठी भाषेतील आद्य शिलालेख

सुरुवातीच्या कालखंडात कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील बाहुबली / गोमटेश्वराच्या पायापाशी असणारा शिलालेख हा मराठीतील सर्वांत प्राचीन शिलालेख असल्याचे मानले जात होते. या शिलालेखात ‘श्री चावुण्ड राजे करवियले श्री गंगराजे सुत्ताले करवियले’ असे नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच हा शिलालेख चामुंडराज व गंगराज यांच्या कारकिर्दीत इसवी सन १११६-१७ मध्ये कोरण्यात आला. या शिलालेखाची नोंदणी अभ्यासकांनी आधी केल्यामुळे हाच मराठीतील प्राचीन शिलालेख असल्याचे गृहीत धरले गेले. परंतु, नंतर झालेल्या संशोधनात महाराष्ट्रातील आक्षी या भागात सापडलेला शिलालेख मराठी भाषा आणि देवनागरी लिपी यांच्या समीकरणातून निर्माण झालेला सर्वांत प्राचीन ज्ञात शिलालेख असल्याचे सिद्ध झाले.

Join @MarathiVyakaranPYQ
👍5🔥1
♦️आक्षीचा शिलालेख

निळ्याशार समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या अलिबागची भुरळ अनेकांना आहे. परंतु, याच अलिबागने आपल्या कुशीत मराठी भाषेचे अस्तित्व सांगणारा आद्य पुरावा अनेक वर्षांपासून सांभाळला आहे. अलिबागच्या आक्षी येथील शिलालेख मराठी भाषेत कोरला गेलेला सर्वांत प्राचीन शिलालेख आहे. हा शिलालेख १० व्या शतकातील शिलाहार राजा केसिदेवराय याच्या कारकिर्दीत कोरला गेला. या शिलालेखाचा जुना संदर्भ कुलाबा जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये सापडतो. त्याशिवाय आक्षी गावात आणखी एक शिलालेख आहे. तो शके १२१३ (इ. स. १२९१) मधील असून, रामचंद्र देव यादव याच्या राजवटीतील आहे. हा शिलालेखही मराठीच्या आद्य शिलालेखांपैकी एक आहे.

Source: लोकसत्ता

Join @MarathiVyakaranPYQ
👍20🔥1
रात्रीच्या वेळी रातराणी गंधीत व मादक भासते. ह्या वाक्यातील उद्देश ओळखा.
Anonymous Quiz
35%
1. रातराणी
20%
2. गंधीत
36%
3. रात्रीच्या वेळी
8%
4. मादक
🔥11👍9🎉3🏆32
👍12🏆54🔥4🥰2🙏2
🙏💐💐🙏
👍19🙏113
' कडून ' , 'करवी ' , 'द्वारा ', ' मुळे ', ' योगे ' , ' प्रमाणे ' ही कोणत्या विभक्तीची अव्यय आहेत?

A. तृतीया

B. चतुर्थी

C. पंचमी

D. षष्ठी
👍46🙏63🎉1👌1
' कडून ' , 'करवी ' , 'द्वारा ', ' मुळे ', ' योगे ' , ' प्रमाणे ' ही कोणत्या विभक्तीची अव्यय आहेत?
Anonymous Quiz
52%
A. तृतीया
19%
B. चतुर्थी
25%
C. पंचमी
5%
D. षष्ठी
👍20🔥2🎉2🙏2
' लाघवी ' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
16%
आर्जवी
33%
लंपट
31%
लडिवाळ
20%
प्रेमळ
👍17🎉3
🙏🙏💐💐💐
🙏6👍3
Q : ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला _________ समास असे म्हणतात.
Anonymous Quiz
9%
1. विभक्ती बहुव्रीही
22%
2. सहबहुव्रीही
15%
3. प्रादि बहुव्रीही
53%
4. नत्र बहुव्रीही
👍104🙏2🎉1
मराठी व्याकरण
🙏🙏💐💐💐
यशवंत ते यशवंतराव आणि यशवंतराव ते अवघ्या महाराष्ट्राचे ‘साहेब’, हा यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा जीवन प्रवास आहे. पण या जीवन प्रवासाचा आरंभाचा विचार केला तर आपल्याला दिसून येते, कुटुंबाची अत्यंत हलाखीची परिस्थिती. वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवलेले पण या परिस्थितीमध्ये दोनच गोष्टीमुळे बदल घडून येऊ शकला.
एक म्हणजे,
नका बाळांनो डगमगू
चंद्रसूर्यावरील जाईल ढगू
अशा
जात्यावरच्या ओवीमधून प्रबळ आशावाद रुजवणारी आणि सकारात्मक विचार मनी ठेवून निग्रहाने सर्व परिस्थितीचा व आव्हानांचा सामना करणारी आई विठाईने यशवंतरावांवर केलेला संस्कार
आणि दुसरे म्हणजे शिक्षण.
कराडच्या शाळेमध्ये शिक्षण घेऊ लागल्या नंतर यशवंत बळवंत चव्हाण या विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मभान जागृत झाले. एके दिवशी गुरुजींनी वर्गामध्ये प्रश्न विचारला,
“शिक्षण घेऊन मोठेपणी तुम्ही कोण होणार आहात?
तसे पाहता शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अत्यंत नकळत्या वयातच हा प्रश्न त्याच्या आई-वडील, नातेवाईक, शिक्षक यांच्यापैकी कुणी ना कुणीतरी विचारलेलाच आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांने याचे उत्तर आपापल्या समजुतीप्रमाणे शिक्षक, डॉक्टर, इंजिनीअर, वकील, पोलीस असे काही उत्तर दिलेले आहे.
आपण मोठेपणी कोण होणार, या प्रश्नाचेयशवंतरावांच्या वर्गातील विद्यार्थ्यांनीही अशाच प्रकारे उत्तर दिले.
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी जेव्हा यशवंत बळवंत चव्हाण या विद्यार्थ्याला उभे राहावे लागले, तेव्हा यशवंताने दिलेले उत्तर हे त्याचे मोठेपण आणि वेगळेपण सांगणारे आहे. यशवंत बळवंत चव्हाण हा विद्यार्थी उभे राहून म्हणाला
“मी यशवंतराव होणार.”
त्यांच्या या उत्तरातून शिक्षणामुळे यशवंतरावांमध्ये आलेल्या आत्मभानाची प्रचिती येते.
👍27🥰1🙏1
मराठी व्याकरण:
♦️मराठी व्याकरण (फक्त पोलीस भरती साठी उपयुक्त मराठी व्याकरण अभ्यासक्रम)

1) मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)

2) म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग

3)  शब्दसंग्रह

4) समूहदर्शक शब्द

5) प्राणी व त्यांची घरे

6)  ध्वनीदर्शक शब्द

7) प्राणी व त्यांची पिल्ले

8) प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक


संकलन : मराठी व्याकरण टेलिग्राम चॅनल
Join Us @MarathivyakaranPYQ
👍15
♦️तुम्हाला माहिती आहे का😀

🟣महत्त्वाचे साहित्यिक व टोपणनावे🟣


🌟 दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. 
                                              पाणिनी

🌟विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा.
                                               शिवाजी

🌟 कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा.
                                             जॉन्सन

🌟 त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी

🌟कृष्णाजी केशव दामले - केशवसुत

🌟 प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार

🌟नारायण मुरलीधर गुप्ते - बी

🌟चिंतामण त्र्यंबक मुरलीधर -
                                      आरतीप्रभू

🌟राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/. 
                                      बाळकराम

🌟 गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी

🌟विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज

🌟माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस

🌟दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
👍41
❇️ मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे

ग्रंथाचे नाव            लेखकांची नावे

1)  हिंदुत्व –           विनायक दामोदर सावरकर

2) बुदध द ग्रेट –       एम ए सलमीन

3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले

4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत

5) छावा –            शिवाजी सावंत

6) श्यामची आई –      साने गुरूजी

7) श्रीमान योगी –     रणजित देसाई

8) स्वामी –        रणजित देसाई

9) पानिपत –      विश्वास पाटील

10) युगंधर –     शिवाजी सावंत

11) ययाती –     वि.स.खांडेकर

12) कोसला –    भालचंद्र नेमाडे

13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे

14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर

15) शाळा –       मिलिंद बोकील

16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर

17) बलुत –     दया पवार

18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे

19) राधेय –      रणजित देसाई

20) दुनियादारी -सुहास शिरवळकर

21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव

22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर

23) पार्टनर – व.पु काळे

24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर

25) राऊ – ना.सं ईनामदार

26) असा मी असामी – पु.ल देशपांडे

27) पावनखिंड – रणजित देसाई

28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर

29) गोलपिठा – नामदेव ठसाळ

30) रणांगन -विश्राम बेडेकर

31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी

32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे

33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे

34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक

35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल

36) झूंज – ना.सं ईनामदार

37) झोंबी – आनंद यादव

38) उपरा – लक्ष्मण माने

39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी

40) चेटकीण – नारायण धारप

41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे

42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर

43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर

44) विनोद गाथा – पी.के अत्रे

45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर

46) उचल्या – लक्षमण गायकवाड

47) हास्यतुषार -पी.के अत्रे

48) भुमी -आशा बागे

49) मारवा – आशा बागे

50) पैस – दुर्गा भागवत

51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत

52) प्रेषित – जयंत नारळीकर

53) अजगर – सी.टी खानोलकर

54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव

55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर

56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर

57) महानायक – विश्वास पाटील

58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे

59) गुलामगिरी -महात्मा फुले

60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे

61) पाचोळा – रा.रं बोराडे

62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले

63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे

64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार

65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील

66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर

67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे

68) अमृतवेल – वि.स.खांडेकर

69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे

70) धग – उद्दव शेळके

71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात

72) हिंदु – भालचंद्र नेमाडे

73) फकिरा -अन्नाभाऊ साठे

74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा

75) अग्नीपंख – अब्दुल कलाम

76) मुसाफिर – अच्युत गोडबोले

77) पांगिरा -विश्वास पाटील

78) झाडाझडती – विश्वास पाटील

79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे

80)  मी माझा – चंद्रशेखर गोखले

81) मर्मभेद – शशी भागवत

82) फास्टर फेणे – भारा भागवत

83) सखी – व.पु काळे

84) राशीचक्र -शरद उपाध्ये

85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी

86) चौघी जणी – शांता शेळके

87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर

88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर

89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत

90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार

91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे

92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी

93) वीरधवल -नाथ माधव

94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर

95) पावनखिंड – रणजित देसाई

96) प्रकाशवाटा – बाबा आमटे

97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे

98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे

99) एकच प्याला – राम गणेश गडकरी

100) किमयागार – अच्युत गोडबोले

101) युगांत – ईरावती कर्वे

102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती

103) निळावंती – मारूती चितमपल्ली

104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर

105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी

106) पडघवली – गो नी दांडेकर

107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी

108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे

109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे

110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर

111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत

112) लज्जा – तस्लिमा नसरीन

113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे

114) ईलल्म -शंकर पाटील

115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात

116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर

117) उपेक्षितांचे अंतरंग – श्री म माटे

118) माणुसकीचे गहिवर – श्री म माटे

119) नापास मुलांची गोष्ट – अरूण शेवते

120) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ
👍684🙏1
🏆 संकलन : मराठी व्याकरण टेलिग्राम चॅनल
Join Us @MarathivyakaranPYQ
👍8
Q : मांजराकडून उंदीर मारण्यात येतो. या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा.
Anonymous Quiz
22%
1. शक्य कर्मणी
54%
2. नवीन कर्मणी
15%
3. पुराण कर्मणी
9%
4. कर्तव्य कर्मणी
👍142
प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात

1. कर्तरी प्रयोग
2. कर्मणी प्रयोग
3. भावे प्रयोग
👍39
Q : खल करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
Anonymous Quiz
10%
1. कष्ट करणे
35%
2. वाईट काम करणे
25%
3. फसवणे
29%
4. निरर्थक चर्चा करणे
👍20👌2
2025/07/10 10:39:21
Back to Top
HTML Embed Code: