🌅 " आजचे सुविचार "
1) कितीही मोठी चूक करा, अडचणी असु द्या सर्व सोडून जातील पण साथ फक्त कुटुंबच देत असतं प्रत्येक परिस्थितीत.
2) वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला खळखळून हसता येतं. त्याच्या सारखा जादूगार जगात दुसरा कुणीच नसतो.
3) ज्या लोकांमधे आपला जन्म झाला, ज्यांच्या सहवासात लहानाचे मोठे झालो. त्या लोकांचा उध्दार करणे हे आपले कर्तव्य आहे, ही जाणीव ज्यांना होत असते ते धन्य आहेत.
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache

❤4👌2
अभ्यासिकेत कमी आणि बाहेरच जास्त वेळ वाया घालवणे – एक जिंदाजनक वास्तव
आजच्या स्पर्धेच्या युगात यश मिळवण्यासाठी अभ्यास आणि एकाग्रता ह्या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक ठरतात. मात्र अनेक तरुण मुलं-मुली अभ्यासिकेत फक्त नावालाच थांबतात आणि खरा वेळ बाहेर वाया घालवतात. ही सवय सुरुवातीला साधी वाटली तरी हळूहळू ती एक जिंदाजनक सवय बनते.
अभ्यासिकेतील चार तास खरे तर संपूर्ण दिवसाचं भविष्य घडवू शकतात. पण तिथे फोनवर स्क्रोल करणे, मित्रांसोबत बाहेर बसणे, चहा सिगारेटमध्ये वेळ घालवणे, या सगळ्या गोष्टी केवळ वेळच नव्हे तर आपल्या स्वप्नांनाही गिळून टाकतात.
या वेळखाऊ सवयींचे परिणाम तात्काळ दिसत नाहीत, पण जेव्हा परीक्षेचे निकाल लागतात किंवा आयुष्यात संधीची दारं बंद होतात, तेव्हा पश्चातापाशिवाय काही उरत नाही. इतर लोक पुढे जातात आणि आपण मागेच राहतो, फक्त एका चुकीच्या सवयीमुळे – अभ्यासिकेत न राहता बाहेर वेळ वाया घालवल्यामुळे.
स्वतःला प्रामाणिकपणे विचार करा – "मी खरंच अभ्यास करतोय की वेळ मारून नेतोय?"
वेळेचं नियोजन करा. बाहेर जायचं वेळ ठरवा, पण अभ्यासाचं वेळ प्राधान्य ठेवा.
मोबाईल, सोशल मिडिया यावर नियंत्रण ठेवा.
अभ्यासिकेतील इतर मेहनती विद्यार्थ्यांशी मैत्री ठेवा, जे प्रेरणा देतील.
स्वतःच्या ध्येयाचा दररोज आठवणीने पुन्हा विचार करा – "मी हे सगळं का करत आहे?"
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा:
बाहेरचं जग आकर्षक वाटेल, पण ते तुमच्या यशाची हमी देत नाही. अभ्यासिकेतील एक-एक तास तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जातो. वेळ वाया घालवणं म्हणजे स्वतःच्या स्वप्नांचा खून करणं.
आज सुधारणा करा, कारण उद्या कदाचित उशीर होईल.
✍️ सुशांत कुलकर्णी
(कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई)
@sushant_kulkarni_official
Insta ID @Dr.Sushant_4848
#शब्द_मनाचे

❤13👌2
🌅 " आजचे सुविचार "
1) सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो...! दुःख, हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो.
2) लोकांना दुसऱ्याची निंदा करायची वाईट सवय आहे. आज आपण जेव्हा दुसऱ्यांवर चिखल उडवतो त्या चिखलाचे शिंतोडे कळत नकळत आपल्याही अंगावर एक ना एक दिवस उडणार आहेत.
3) प्रत्येकाला भावना असतात प्रत्येकालाच मन असते. एक - दुस-याला समजण्यातच खरे माणूसपण असते.

❤5
देव नाही हे मला कोणी कधीही पटवून देऊ शकत नाही,कारण त्याने अनेक वेळा मला सावरलंय आणि दाखवून दिलंय की तो आहे..!
@rutuja_writes1203
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
@rutuja_writes1203
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
❤14
Forwarded from Sushant Kulkarni ( महाराष्ट्र शासन 🚨) Assistant Secretary parliament 🚨
"वाढती स्पर्धा, वाढती भीती – आणि माझा संघर्ष"
लेखक – सुशांत, Assistant Secretary,
दिवसेंदिवस स्पर्धा वाढते आहे. प्रत्येक दिवशी हजारो नव्या उमेदवारांचं स्वप्न असतं – अधिकारी होण्याचं. आणि हे स्वप्न जगताना मनात एकच प्रश्न सतत टोचत राहतो – "आपलं काय होणार?"
मी, सुशांत, सुद्धा स्पर्धा परीक्षा देणारा एक सर्वसामान्य विद्यार्थी होतो. माझी परिस्थिती फारच हालकीची होती – आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आणि मनोबलदृष्ट्या सुद्धा. अनेकदा अंधाराच्या काळात वाट चुकल्यासारखं वाटलं. परीक्षांमध्ये अपयश आलं, लोकांनी हसवले, नातेवाईकांनी टोमणे मारले. पण मी एक गोष्ट स्वतःला ठामपणे सांगत राहिलो –
"जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत थांबायचं नाही!"
माझं आणि माझ्या कुटुंबाचं भविष्य हे माझ्या यशावर अवलंबून होतं. जर मी थांबलो, तर केवळ माझं नव्हे तर माझ्या संपूर्ण घरच्यांचं अस्तित्व संकटात येईल – ही जाणीव माझं बळ बनली. "जर मी अधिकारी झालो, तर पुढचं आयुष्य कसं असेल?" या विचारानेच मी जीवापाड मेहनत करत राहिलो.
मी स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ नोकरीसाठीची धाव नाही, तर स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मानली. रोज अपयशांनी खचलेलो असलो, तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने उठून अभ्यासाला लागायचो. हेच सातत्य, हीच जिद्द अखेर मला "Assistant Secretary सह MPSC मधून 4 पोस्ट तसेच UPSC मधून Assistant Secretary–या पदापर्यंत घेऊन गेली.
माझा अनुभव काय सांगतो?
स्पर्धा ही भीती निर्माण करते, पण तीच तुमचं धार वाढवते.
परिस्थिती कितीही वाईट असली, तरी मनाची स्थिती सकारात्मक असेल, तर यश अटळ आहे.
थांबलात तर सगळं संपेल, पण चालत राहिलात तर यश नक्की गाठाल.
स्पर्धा वाढेल, अपयश येईल, भीती वाटेल – पण लक्षात ठेवा, "अधिकारी होणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार नाही, पण तो तुमच्या जिद्दीचा निकाल नक्की आहे."
माझी यशोगाथा हेच सांगते – "थांबू नका, झुकू नका, यश तुमच्या प्रयत्नांना नमवायला तयारच असेल!"

❤11🙏1
मैत्री म्हणजे एक दुसऱ्याचा श्वास।।मैत्री म्हणजे एकमेकांवर निस्वार्थपणे टाकलेला विश्वास।।मैत्री म्हणजे एकमेकांना लागलेली अनोळखीपणाची आस।। मैत्री म्हणजे मी देवाला तुझ्यासाठी केलेली आरास।। मैत्री म्हणजे तू व्यक्ती म्हणून माझ्यासाठी खूपच खास!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
❤15
🌅 " आजचे सुविचार "
1) ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त कराल त्याच्याकडून तितकेच जास्त, दु:ख वाट्याला येते. आणि ज्याच्या कडून जितक्या अपेक्षा कमी, त्याच्याकडून, फारसे दुःख मिळत नाही. म्हणून म्हणतो की, कोणाकडूनही फार मोठ्या अपेक्षा ठेऊच नका...!!
2) ज्यांच्यासोबत आपण कधीच वाईट वागलो नाही, ते सुद्धा दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्याबद्दल चुकीचे मत बनवतात आणि आपल्याला जज करत बसतात. कारण लोक सत्य पाहत नाहीत, ते फक्त ऐकलेलं खरं मानतात!
3) आपले आयुष्य इतर कोणीही नियंत्रित करू शकत नाही. आपले विचारच आपलं आयुष्य नियंत्रित करून त्याची दिशा आणि दशा बदलू शकतात.

❤3
आयुष्याच्या या रंगमंचावर आपली भूमिका अशी असावी की पडदा पडल्यावरसुद्धा टाळ्या वाजत राहतील..!
@rutuja_writes1206
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
@rutuja_writes1206
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
❤11
गाव ते गावचं...😇❤️
"अगं वृषाली काय सांगू तुला माझा मुलगा राहतच नाही अगं" रडलेल्या स्वरातच ती मला फोन वर बोलत होती🥺 "अगं मी तुला कितीदा म्हणल शहरात राहण्यापेक्षा इकडं गावात येउन रहा तिथं एका खोलीत त्या पोराला कोंडल्यासारखं होत असेल पण तू तर म्हणते मला सासू सासरे नको फक्त नवरा माझ्यासोबत राहायला पाहिजे मग आता तुला मी काय सांगू"... गावाकडं राहील म्हणजे सासू सासरे असतात दीर, भावजय असते एकत्र कुटुंब असलं की कस घर भरभरून दिसत😍 त्यामुळे तुझ्या मुलाला पण तिथं करमेल आणी तुलाही...😇 सासू सासरे कटकट वाटत असतील तरी वेळेवर तीच काम येतात कारण आपली माणसं ती आपलीच माणसं...🤗 तुझ्या मुलाला आजी आजोबांचं प्रेम भेटेल, संस्कार मिळतील, अनुभव मिळतीलं, त्याच्याकडे पाहून तो खूप काही शिकेल आणी शेवटी कितीही म्हणलं तरी शहराला कुठं गावची सर यायची ? 😌 गाव ते गावचं असत जस गावची मोकळी हवा तशीच इथली माणसही अगदी मोकळी, प्रेमळ, जीव्हाळी असतात... 🤗❤️ शहरात गेलात तर "चहा घेणार का"? विचारतात आणी गावाकडं गेलं तर अतिथी देव भवं असं मानलं जात म्हणून झोपडीतही दोन घास खाल्ल्याशिवाय आणि कपभर चहा पाजल्याशिवाय जाऊ देत नाही हीच गावाकडची रीत...😌❤️ शहरात तुम्हाला घर नंबर वरून ओळखल्या जाते पण माझ्या गावात माझ्या बापाच्या नावावरूनच मला ओळखले जाते...😎🤌🏻 अहो लाख पैसा असेल तुमच्या शहरात पण जीवाला जीव देणारी माणसं, एकमेकांना जपणारी माणसं तुम्हाला आमच्या गावातच मिळतील...!☺️🤗
✍प्रियंका भोसले...✍

❤8👍1
Forwarded from Vinayak Bhise
मावशी म्हणजे आईच
निस्वार्थ प्रेम करणारी
मायेचा महासागरच
मावशी म्हणजे आईच
लाड, प्रेम, हट्ट ,काळजी
सारं अमर्यादित
आई मरो पण मावशी जगो,
या म्हणीच अर्थ कधी
मला समजला नाही,
कारण
मला माय-मावशी यातील
फरक दिसला नाही.
ती केवळ नात्याने मावशी नाही,
तर ती आईच आहे
जगणं शिकवते, बळ देते,
पाउलो पाऊली साथ देते
प्रत्येक संकटात आधार देते
सदैव खंबीरपणे उभा राहते
तिच्या डोळ्यात मी पाहिली,
आईचीच ती माया.
कधी कठोर झाली नाही,
केवळ दिली प्रेमाची छाया.
मावशी म्हणजे आईच
वात्सल्याचा झरा
प्रेमाचा महासागर
मायेचं आभाळ
मावशी म्हणजे आईच
तिच्याविना आयुष्य सारं अपुरे
जन्मोजनमी आई
म्हुणूनी तूच मिळावी
हे मागणं मागतो मी देवाला
✍विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143
आवडल्यास प्रतिक्रिया कळवा व शेअर करा
निस्वार्थ प्रेम करणारी
मायेचा महासागरच
मावशी म्हणजे आईच
लाड, प्रेम, हट्ट ,काळजी
सारं अमर्यादित
आई मरो पण मावशी जगो,
या म्हणीच अर्थ कधी
मला समजला नाही,
कारण
मला माय-मावशी यातील
फरक दिसला नाही.
ती केवळ नात्याने मावशी नाही,
तर ती आईच आहे
जगणं शिकवते, बळ देते,
पाउलो पाऊली साथ देते
प्रत्येक संकटात आधार देते
सदैव खंबीरपणे उभा राहते
तिच्या डोळ्यात मी पाहिली,
आईचीच ती माया.
कधी कठोर झाली नाही,
केवळ दिली प्रेमाची छाया.
मावशी म्हणजे आईच
वात्सल्याचा झरा
प्रेमाचा महासागर
मायेचं आभाळ
मावशी म्हणजे आईच
तिच्याविना आयुष्य सारं अपुरे
जन्मोजनमी आई
म्हुणूनी तूच मिळावी
हे मागणं मागतो मी देवाला
✍विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143
आवडल्यास प्रतिक्रिया कळवा व शेअर करा
❤12
🌅 " आजचे सुविचार "
1) आयुष्यात तुम्हाला जे मान देऊन सोबत घेऊन जातील त्यांचाच मान राखा. कारण या जगात मान देऊन कान भरणारे आणि तोंडावर गोड बोलून पाठीमागे निंदा करणारेच अधिक भेटतील.
2) कोणाच्या सांगण्यावरून कधी कोणाशी वाईट होऊ नका कारण थोड्या दिवसांनी ते एकत्र येतात आणि आपण वाईट होतो. त्यामुळे सगळ्यांसोबत प्रामाणिकच रहा.
3) समजायला, समजून घ्यायला, आणि समजावून सांगायला समजूतदारपणा असावा लागतो..!
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
1) आयुष्यात तुम्हाला जे मान देऊन सोबत घेऊन जातील त्यांचाच मान राखा. कारण या जगात मान देऊन कान भरणारे आणि तोंडावर गोड बोलून पाठीमागे निंदा करणारेच अधिक भेटतील.
2) कोणाच्या सांगण्यावरून कधी कोणाशी वाईट होऊ नका कारण थोड्या दिवसांनी ते एकत्र येतात आणि आपण वाईट होतो. त्यामुळे सगळ्यांसोबत प्रामाणिकच रहा.
3) समजायला, समजून घ्यायला, आणि समजावून सांगायला समजूतदारपणा असावा लागतो..!
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❤4
ओढ मनी घेऊन विठ्ठलाच्या भेटीची,
वाहे चंद्रभागा तशी वारकरी चाले वाट पंढरीची..!
पांडुरंग भक्तीत तल्लीन होऊन चाललेल्या वारकऱ्यांना, आभाळाकडे आस लावून बसलेल्या बांधवरील शेतकऱ्यांना आणि विठुरायाच्या दर्शनाने सुखाचा सोहळा साजरा करणाऱ्या तमाम जनतेस आषाढी एकादशी निमित्ताने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

❤1
Forwarded from Sushant Kulkarni ( महाराष्ट्र शासन 🚨) Assistant Secretary parliament 🚨
"कर्म, प्रामाणिकपणा आणि यशाची खरी वाटचाल"
भविष्य, नशिब, लक — या संकल्पना अनेकदा आपल्या आयुष्यातील अडचणींचं समर्थन म्हणून वापरल्या जातात. पण खरंतर या गोष्टी केवळ मनाचं समाधान देणाऱ्या कल्पना आहेत. आयुष्यात यश मिळवायचं असेल, तर फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे – आपलं कर्म आणि आपल्या स्वप्नांशी प्रामाणिक राहणं.
🍂 जगात कोणीही यशस्वी व्यक्ती पहा, त्यांनी कधी नशिबावर विसंबून यश मिळवलेलं नसतं. त्यांनी परिश्रम केलेले असतात, अडचणी पेललेल्या असतात, हजारो वेळा अपयश पचवलं असतं आणि तरीही चालत राहिलेले असतात. कारण त्यांना ठाऊक असतं की “नशिबानं नाही, तर मेहनतीनं आयुष्य घडतं.”
💡 आपल्या स्वप्नांशी प्रामाणिक राहणं म्हणजे प्रत्येक क्षणात स्वतःला आठवण करून देणं की, "मी का सुरुवात केली होती?"
त्यासाठी सोपं नाही…
– कधी कंटाळा येतो
– कधी अपयश येतं
– कधी आजूबाजूचं जग आपल्या पाठीमागे उभं राहत नाही
पण जो व्यक्ती या सगळ्याच्या विरुद्ध उभा राहतो, तोच खरा यशाचा मानकरी ठरतो.
🚶♂️ प्रत्येक टप्प्यावर चुका होतील. अपयश येईल. पण याच चुकांमधून शिकणं आणि पुन्हा एक पाऊल पुढे टाकणं, हाच यशाचा मंत्र आहे. नशिबाची वाट पाहत बसण्यापेक्षा, प्रयत्नांची वाट चालत राहणं केव्हाही श्रेष्ठ!
🌟 यश कोणालाही सहज मिळत नाही. ते कमवावं लागतं. सततचा प्रयत्न, स्वप्नांशी असलेली निष्ठा आणि प्रामाणिक मनानं केलेलं काम – हेच यशाच्या मार्गावरचे खरं बळ आहे.
🔚 शेवटी इतकंच म्हणावंसं वाटतं –
"भविष्य आपल्याला काहीच देत नाही,
आपण जे निर्माण करतो तेच आपलं होतं.
नशिब नाही,
फक्त कर्मावर विश्वास ठेवा
आणि आपल्या स्वप्नांशी प्रामाणिक राहा —
यश तुमच्या पावलांशी येऊन लीन होईल!"

❤2
मला माहिती नाही राव देव आहे की नाही पण मात्र संतांच्या भक्तीत तो दिसतो वीरांच्या शक्तीत तोच असतो शेतकऱ्यांच्या कष्ठतात तो मदतीला बसतो परिस्थितीला तोंड देण्याऱ्या व्यक्तीच्या सुखात तो हसतो असं म्हणतात की चांगल्या वाईट कर्माचं फळ योग्य प्रकारे तोच देतो मग का बरं माणूस वाईट कृत्य करून चांगुलपणाचा आव आणत असतो.🙏🏻.नक्कीच विचार करा!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
❤5👍1
🌅 " आजचे सुविचार "
1) दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हे अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे.!
2) गमावल्यानंतर शोधण्याला काहीच अर्थ नसतो. कारण, शोधून फक्त हरवलेल्या गोष्टी सापडू शकतात. गमावलेल्या नाही..!
3) संघर्षाचा काळ एकट्यानेच लढावा लागतो चांगल्या वेळेत तर ओळख नसलेले सुद्धा ओळख देतात.
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
1) दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हे अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे.!
2) गमावल्यानंतर शोधण्याला काहीच अर्थ नसतो. कारण, शोधून फक्त हरवलेल्या गोष्टी सापडू शकतात. गमावलेल्या नाही..!
3) संघर्षाचा काळ एकट्यानेच लढावा लागतो चांगल्या वेळेत तर ओळख नसलेले सुद्धा ओळख देतात.
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
👍1
जेवढी ओढ वारकऱ्यांना विठ्ठलाच्या भेटीची असते, त्यापेक्षा अधिक ओढ ही विठ्ठलाला वारकऱ्यांच्या भेटीची असते.
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
❤8
Forwarded from ❚█══❦𝘞𝘳𝘪𝘵𝘦𝘳 𝘈𝘣𝘩𝘪 ❦ ══█❚
कधी कधी तर असं वाटतं,🥀😌 की देवाने उगाच आपल्याला भावनांच स्वातंत्र्य दिलं कारण ज्या व्यक्तीसाठी मनात भावना असतात ना, नेमकं त्याचं व्यक्तीच्या पुढे आपल्या भावनांची किंमत शून्य असते🍃🍁
@Writer_sonya
@Writer_sonya
❤14