tgoop.com/srimantyogishivajimaharaj/10886
Last Update:
*कसा आहे ' छावा ' चित्रपट !?* ( review )
....
-- आदेश म्हस्के ✒️ ©®
काल अखेर छावा चित्रपट पाहण्याचा योग आला - उठसुठ नुसते चित्रपट पहावेत असा मी माणूस नाही पण वर्षात पाच- सहा चांगले चित्रपट नक्कीच पाहतो. त्यात महाराजप्रेमी - इतिहासप्रेमी या नात्याने नुकताच आलेला छावा चित्रपट - आपला इतिहास आपला अभिमान या भावनेने पाहण्यासाठी हजेरी लावली. चित्रपटगृहात पाऊल टाकले आणि तेवढ्यात राष्ट्रगीत कानावर पडले. शाळा सोडल्यानंतर असे राष्ट्रगीत फार कधी कानावर येत नाही म्हणून आज अचानक ते ऐकून आणि जो तो स्वतःच्या जागेवर सावधान थांबेलला पाहून विशेषच वाटले. अर्थात सुरवातच राष्ट्प्रेमाने भरून अशी झाली. त्यावरून हेही लक्षात आले की, शाळेत मुलांना राष्ट्रगीत सुरू झाले की शांत थांबायचे ही बालवयात दिलेली शिकवण आजही मोठेपणी सर्वांच्या वागण्यात दिसते कारण ते एक बाळकडू आहे. हेच बाळकडू घेण्यासाठी मनातले बाळ आज पुन्हा एकदा चित्रपटगृहात आले होते.
छावा चित्रपट सुरू झाला - रसिकांना / प्रेक्षकांना सुरवातीलाच एका ऐतिहासिक कालखंडात घेऊन जाणारी संभाजी महाराजांच्या आधीच्या हिंदोस्थानची परिस्थिती दर्शवणारी झलक प्रेक्षकांना करून देण्यात आली.. त्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या आधी शिवकाळात महाराजांचे कार्य कसे होते ? हे थोडक्यात सांगण्यात आले. शिवाय या अखंड हिंदुस्थानात जे मुघल आणि परकीय शासक यांनी हौदोस घातला होता त्यांना रोखणारे जर कोणी या भारतभूमीत होते तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासोबत स्वराज्यासाठी लढणारे तुफानी मावळेच ! जेव्हा अखंड हिंदुस्थानात या आलमगीर विरुद्ध आवाज उठवण्याची हिम्मत नसते तेव्हा फक्त छत्रपतीच या मोगली पहाडी, क्रूर,कपटी शासकाला सामोरे जातात यावरून त्यांचे महत्त्व प्रेक्षकांना सहजपणे कळून जातेच बाकी छत्रपती शिवाजी महाराजांचे महान कर्तृत्व/ त्यांचा शौर्यगाथा या जगाला ठाऊक आहेच.
महाराजांनी ज्याप्रमाणे सुरत लुटली त्याप्रमाणे त्यांचा पावला वर पाऊल ठेवत त्याच रणनितीने संभाजी राजांनीही बुऱ्हाणपूर लुटले. या लढाईने चित्रपटाची सुरवात होते. याच लढाईतील क्षण टिपताना अस्सल योध्ये त्यांचे शौर्य अशी शौर्यगाथा पाहताना पाहणारे थक्क होऊन जातात आणि त्या मावळ्यांना त्यांचा पराक्रमाला पाहतच राहतात अशा विजयी घौडदौडीने चित्रपटाची सुरवात दिमाखदार होते.
त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचे रायगडावरील वास्तव्य - मग हे वास्तव्य असताना त्यांना साथ देणाऱ्या श्री सखी महाराणी येसूबाईंनी साकारलेली भूमिका अगदी मूळ पात्राला न्याय देणारी आहे - त्याव्यतिरिक्त गडावर अनाजी पंत आणि त्यांचे काही साथीदार सोबत सोयराबाई यांचे कटकारस्थान शिजत असते हे ही दाखवण्यात आले आहे - छत्रपती संभाजी राजांसोबत खंबीरपणे उभी राहणारी थोरल्या महाराजांसोबतची मंडळी त्यांच्याशी राजांचे असणारे स्नेहपूर्वक संबंधही उत्तम दाखवण्यात आले आहेत. आशा काही गोड - तिखट घडामोडींनी चित्रपटाची सुरवात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गलोकी गेल्यानंतर हा हिंदुस्थान अर्थात आजचा भारत सहजपणे काबीज होईल या औरंगजेबाच्या स्वप्नांवर संभाजी महाराजांच्या पराक्रमाने पाणी पडते. त्यामुळे अनेक मुघल सरदाराना तो सतत स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी पाठवतो पण राजे काही हाती लागत नाहीत. उलट वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा गनिमीकावा मराठा सैन्य करत असे हे दाखवण्याचाही प्रयत्न दिगदर्शकाने केला आहे. हा गनिमी कावा दाखवताना थोडा क्लायमॅक्स बनवण्याचा प्रयत्न झालाय ऐतिहासिकपणा कमी होऊन सुपरहिरो सारखं थोडंफार वाटून जातं पण ते ठीक आहे पाहणाऱ्यांनी त्यामागे गनिमीकावा दाखवायचा आहे दिग्दर्शकाला हे समजून घ्यावे. छत्रपती संभाजी महाराजांनी जे गनिमीकावा पद्धतीने हल्ले सुरू केले होते या अशा छोट्या मोठ्या लढायांनी औरंगजेबाचे सरदार चिंतित होऊन त्याला सांगतात " आलमगीर आपले सैन्य कमी होत आहे, धन कमी होत आहे, भीती कमी होत आहे पण संभा कुठेही दिसेना " मग शेवटी चवताळलेला वैतागलेला क्रूर औरंजेब छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्याचा प्रण घेतो " जोपर्यंत संभा ला पकडत नाही तोपर्यंत मुकुट घालणार नाही " म्हणतो आणि सर्व ताकदीनिशी महाराष्ट्राकडे कुच करतो. म्हणजे एवढे सरदार त्याकडे असताना खुद्द सगळा फौजफाटा घेऊन तो या तरुण राजाला पकडायला येतो. यातच हा राजा म्हणजे छावा आहे याची जाणीव होते. अक्षय खन्ना ने जो औरंजेब साकारला आहे त्याला अगदी तोडच नाही. शिवाय औरंजेब चुकीला फार माफी देत नाही. तो सजा देतो हे त्याचे स्पष्ट धोरण दिसते त्याचा दरारा त्याचा भूमिकेतून जाणवतो. हवं ते हवं तसं मिळणारा हा आलमगीर स्वराज्य काही हाती येत नाही या विचाराने सतत अस्वस्थ असतो. आपण चुटकीत स्वराज्य घेऊ. नष्ट करू. अशा विचारांनी तो जंग छेडतो पण दक्खनेत येऊनही कित्येक वर्षे त्याला हवं ते मिळत नाही याने तो जेरीस आलेला दिसतो.
BY छत्रपती शिवाजी महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj | Chattrapati Sambhaji Maharaj | HD WhatsApp Instagram Status Maharashtra
Share with your friend now:
tgoop.com/srimantyogishivajimaharaj/10886