tgoop.com/srimantyogishivajimaharaj/10887
Last Update:
औरंजेबविरुद्ध लढताना ज्याप्रमाणे त्यांचा एखादा मुघल सेनानायक मारला जायचा तसाच स्वराज्याचाही एक एक हिरा या युद्धात गहाळ होत होता. छत्रपती संभाजी महाराजांची ढाल असणारे हंबीरराव मोहिते, मालोजीबाबा असे निष्ठावंत सरदार ऐन लढाईच्या तोंडावर वीरगती प्राप्त होतात. यामुळे छत्रपती संभाजी महाराज काहीसे एकटे पडतात. इतरही काही किल्लेदार मुघलांच्या लालचेला बळी पडतात आणि स्वराज्याचा छावा अशा तऱ्हेने एकटा पडतो. छत्रपती शिवाजी महाराजांची एक लहानपणापासूनच्या संवगड्यांची एक भक्कम साखळी असते तशी काहीशी मजबूत साखळी छत्रपती संभाजी राजांना भेटत नाही म्हणा किंवा तेवढा वेळच नव्हता की हे सर्व पाहता येईल कारण चहोबाजुनी स्वराज्यावर हल्ले सुरू असत. मग शेवटी या देशातील इतिहासाला जो शाप आहे फितुरीचा तोच शाप उदयास येऊन औरंजेबास काही खबरी मिळतात आणि अचानक कल्पना नसताना मोठे सैन्य छत्रपती संभाजी महाराजांवर चालून येते. आजपर्यंत संभाजी राजांना पकडण्यात झालेल्या चुकांचा गाढ अनुभव मुरकरबखानाकडे होता त्याच चुकाना यावेळी भरून काढत त्याने लावलेली यंत्रणा सफल झाली. महाराज संगमेश्वर येथे असतात. महाराज फसतात. छावा शत्रूच्या तावडीत सापडतो. तिथेही महाराज थांबत नाहीत अगदी मार मार लढतात पण शत्रू संख्या ढिगाने वाढते. वाढतच राहते. शत्रूत आपलेच काही गद्दार असल्याने घेरण्याची रणनीती मजबूत बनवलेली असते. शेवटी राजे किती शत्रूला कापणार ? ते सर्व पाहताना खरंच हा माणूस हा स्वराज्याचा दुसरा छत्रपती ' छावाच ' आहे याची जाणीव पाहणाऱ्याना होते. छावा नावाला खरं उतरावं अगदी असाच तो छावा आहे. जो विकी कौशल याने पूर्ण प्रयत्न देऊन साकारला आहे. आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराज जे ऐकत आलो आहे तेच जणू त्या चेहऱ्यात दिसावेत असा उत्तम अभिनय विकी कौशल याने केला आहे त्याचे खरंच आभार.
कैद झाल्यानंतर आपलेच लोक फितूर असतात. हे राजे उघड्या डोळ्यांनी पाहतात तेव्हा राहून राहून मला वैयक्तिक वाटतं की, शिवाजी महाराज असते तर कदाचित या शिर्के मंडळींचा आधीच बंदोबस्त लावला असता. जी कीड आज जिने वतनाच्या लोभासाठी स्वराज्याचा छत्रपतींना फसवण्यापर्यंत निचपणा गाठला. हे असं घडायला नको होतं याच विचाराने प्रत्येकजण हळहळ व्यक्त करतो पण नियतीने म्हणा किंवा दुर्दैवाने छत्रपती संभाजी राजांना या षडयंत्राची अचानक झालेल्या हल्ल्याची कल्पना नव्हती. तरीही ते प्राणपणाने लढले, प्राणपणाने प्रतिकार केला. तो प्रतिकार पहावा असाच आहे. एक एक क्षण त्या झुंजीतला जणू सांगतो आहे नाही - नाही मला हार मान्य नाही - नाही जाऊ देणार स्वराज्य मी या मुघलांच्या घशात असे सहजपणे आणि तो चिवट लढा पहायला मिळतो.
_____
चित्रपटाच्या दुसऱ्या भागात चित्रपटाला एक दुर्दैवी वळण लागते. आत्तापर्यंत पाहिलेला शेर शिवा का छावा आता गिधाडांच्या कैदेत सापडून डिवचला जावा तसा डिवचला जातो... संगमेश्वर येथे अगदी मोजक्या सैन्यासह रणनीती बनवण्यात राजे व्यस्त असताना अचानक मुघलांची टोळधाड पडते. अशा स्थितही शंभूराजे नेहमीप्रमाणे त्यांचा रुद्रावतार धारण करून शत्रूंना यमसदनी पाठवतात पण ती झुंड एवढी मोठी असते की, हा एकटा छावा अखेर किती वेळ आणि किती जणांना रोखणार अक्षरशः त्या लढाईत सर्वात जास्त कोण लढत असेल तर ते छत्रपती संभाजी महाराज आणि त्याच क्षणी प्रेक्षकांना जाणीव होते राजे फसले , राजे गुंतले साखळदंडाने राजांना बांधण्यात येते जेणेकरून त्यांना केवळ मैदानात मृत्यू न देता औरंगजेब समोर पेश करता यावे. जीव वाचवण्यासाठी एखाद्याची तडफड व्हावी - मनातुन आवाज यावा मी हरलो नाहीये. मी अजूनही लढू शकतो. मी अजून जिवंत आहे. माझे हात सोडा मग मी दाखवतो इत्यादी हे जे काही भाव त्या क्षणी विकी कौशल ने साकारले आहेत ते अगदी खरेखुरे आहेत. अगदी शेवटच्या छळापर्यंत या राजाच्या चेहऱ्यावर शरणागतीचे किंचितही भाव येत नाहीत. औरंजेब आजवर तरसला शेवटीही तो राजांना शरण आणू शकला नाही आणि तरसूनच या महाराष्ट्राच्या मातीत समाप्त झाला ! चित्रपटात औरंजेब त्याचा छावणीत जो छळ सुरू करतो ते पाहताना डोळे मिटून घ्यावेत की काय ! आपला हसता खेळता राजा असा पाहवला जात नाही. पाहणारे स्तब्ध होऊन जातात- अनेक ऑफर महाराजांना दिल्या जातात पण चित्रपट बनवताना काही अडचण येऊ नये म्हणून काही नियमांची पायमल्ली करावी लागते ती म्हणून की काय, काही गोष्टी मुद्दाम त्या संवादात घेतल्या गेल्या नाहीयेत पण मोजक्या संवादासाहित तो छळ दाखवला गेला आहे. अखेरपर्यंत मृत्यूशी झुंजताना संभाजी राजांना साथ देणारे कवी कलश म्हणजे मैत्रीचे निस्सीम उदाहरण आपल्याला दिसते. स्वराज्याचा मातीसाठी अमर होत अखेर शंभूराजे शेवटचा श्वास घेतात आणि चित्रपटाचा शेवट होतो. प्रत्येकाने हा सत्य इतिहास पहावा एवढंच सांगेल.
BY छत्रपती शिवाजी महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj | Chattrapati Sambhaji Maharaj | HD WhatsApp Instagram Status Maharashtra
Share with your friend now:
tgoop.com/srimantyogishivajimaharaj/10887