tgoop.com/srimantyogishivajimaharaj/10888
Last Update:
खरंतर चित्रपटात दाखवला त्याहुनही अधिक छळ महाराजांचा झाला आहे याच्या नोंदी आहेत पण जे दाखवले त्यातच माणूस रडत आहे त्यामुळे आणखीन किती दाखवावे असे निर्मात्याला वाटले असावे किंवा तीन तासात सर्व काही बसवायचे असते म्हणून त्यांनी ते अधिक लांबवले नसावे असेही असेल. शिवाय शौर्यपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळापूर येथे छावणी असताना महाराजांचा शेवटचा श्वास गेला. त्यानंतर त्यांचे तुकडे तिथेच नदीकाठी फेकण्यात आले पुढे वढू येथील ग्रामस्थांनी ते जमा करून वढू बुद्रुक या गावात कवी कलश आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे अंतिम संस्कार करण्यात आले. आजच्या घडीला ते अंत्यसंस्कार कोणी केले यावरूनही पुरावे सोडून वाद निर्माण करणारे दोन गट आहेत असे जाणून आहे. त्यामुळे कदाचित त्या वादात उडी नको म्हणून दिगदर्शकाने शेवटचे अंतिम क्षण दाखवणे टाळले आणि ते योग्यच केले. कोणत्याही वादाला विरोधाला सामोरे न जाता तसेच सेन्सर बोर्डाकडून चित्रपटाला कात्री बसणार नाही याची काळजी उतेकर यांनी पुरेपूर घेत जे न बोलता दाखवायचे ते एकदम बरोबर ठसवण्यात छावाची टीम यशस्वी झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. चित्रीकरण शूट म्हणून म्हणाल तर पाचपैकी 4.3* ठीक आहेत आणि व्यक्तिरेखा म्हणून म्हणाल तर 4.8* ठीक राहतील. असा हा छावा चित्रपट सर्वांनी पहावा. सत्य डोकावून पहावे कारण सत्य कधीच मिटत नाही आणि छावा या भारताचा धगधगता इतिहास आहे 🔥
_________
Social media वर कंमेंट्स करत बरळायला काहीही अक्कल लागत नाही. त्याप्रमाणे हा चित्रपट आला आणि आपल्याच काही मराठी मुर्खानी अजय अतुलचं गाणं हवं , हिरोईन ही हवी , अमुक हवं तमुक हवं असे पाढे सुरू केले आहेत. स्वतःच्या आयुष्यात स्वतःला काय हवं ? कसं हवं ? हे न उमजणाऱ्या या महाभागांना इतरांना सल्ले देण्यात मजा येते आणि हे घडते ते केवळ अल्पबुद्धितूनच ! अशा विकृत औलादी महाराष्ट्राला नवीन नाहीत ! चित्रपट पाहून त्यात काहीही मला गैर वाटले नाही ! चित्रपटात कोणाला घ्यावे कोणाला नाही हा दिगदर्शकाचा अधिकार आहे - त्याच्याही काही बाजू असतात. अगदी ज्याप्रमाणे तुम्हाला जो कलाकार हवा तो त्यांना होकार देईल असे नसतेच. शिवाय चित्रपट बनवण्यात किती मोठा खर्च आहे - वेळ आहे - जोखीमही आहेच इत्यादी अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे दिगदर्शकाने त्यावर अभ्यास करून, वेळ घेऊन, जाणत्यांची मते घेऊनच चित्रपट बनवला आहे. तो काही एका रात्रीत बनवला गेलेलो नसतो. जरा या दृष्टीनेही पहायला हवं. उगाच आईबापने काढलेली विकृत औलाद म्हणून एकदम टिकलीच गोल का लावली ? चंद्रकोर का नाही लावली ? अशा सुष्म चूका काढणाऱ्या औलादी दिसतात तेव्हा दुर्दैव वाटते.. एवढा मोठा चित्रपट बनवताना अशा सुष्म गोष्टी राहू शकतात समजून घेण्याची गोष्ट आहे. मराठी माणसाने तर आपला इतिहास जागतिक स्तरावर पोहचतो आहे याचा अभिमान बाळगायला हवा. शिवाय जे काही बदल अपेक्षित होते तेसुद्धा दिग्दर्शक उतेकर यांनी सन्मानाने दुरुस्त करून टाकले ( जसे की हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ) हे बदल रास्त होते. त्यामुळे योग्य ते बदल सुचवणे ठीक पण नुसता स्वतःला वाटेल तसं हवं या विचाराने फक्त विरोधच करून बदल करण्याची यादीच वाचणे म्हणजे मूर्खपणा आहे. बाकी या चित्रपटासाठी सर्व टीमचे मनापासून आभार ! असे आणखीन चित्रपट येत राहो जेणेकरून हा मातृभूमीचा सत्य इतिहास या भारतीयांना नेहमी स्मरणात राहील. तानाजी, बाजीराव, पद्मावत, छावा, पावनखिंड, सुभेदार, सरसेनापती हंबीरराव मोहिते इत्यादी अशा ऐतिहासिक चित्रपटांच्या माध्यमातून इतिहास पुन्हा जिवंत होत आहे. आपण आपल्या इतिहासाप्रति नक्कीच प्रेम दाखवले पाहिजे, निर्मिती करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. अशाच उत्कृष्ट निर्मतीसाठी आम्ही नेहमी आपल्या सोबत आहोत एवढेच सांगणे 💯
______
*छावा पाहिल्यानंतर .....*
आजपर्यंत फक्त छावा - छावा हे बिरुद ऐकून होतो. संभाजी राजांनी सिंहाचा जबडा फाडला म्हणून छावा म्हणत असावेत इथपर्यंतच जाणून होतो पण छावा चित्रपट पाहताना प्रत्येक क्षणी पाहणाऱ्याला कळते की, हो हाच आहे तो छावा आणि का आहे छावा याची अनुभूती येत राहते. " शौर्य कभी कम पड जाये तो मराठा साम्राज्य पढ लेना " हे अगदी खरं आहे. किती तो मोठा शौर्याचा पराक्रमाचा वारसा या साम्राज्याने या भारतभूमीला दिला आहे. कित्येकदा हे योध्ये स्व भूमीच्या रक्षणासाठी जीवावर उदार होऊन लढले आहेत. धर्मासाठी लढले असा उल्लेख चित्रपटात टाळला असला तरी गोष्ट धर्मापाशी येऊन थांबते. ती अशी की, स्वराज्यातील रयतेला त्यांच्या संस्कृती प्रमाणे, त्यांच्या पद्धतीने जगू दिले जात नव्हते. शेवटी ही संस्कृती हे जगणे आले कुठून तर सनातन धर्मातून मग याच दैनंदिन जीवनासहित जर त्यांना जगता येत नसेल तर ते हतबल होणारच.
BY छत्रपती शिवाजी महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj | Chattrapati Sambhaji Maharaj | HD WhatsApp Instagram Status Maharashtra
Share with your friend now:
tgoop.com/srimantyogishivajimaharaj/10888