tgoop.com/srimantyogishivajimaharaj/10891
Last Update:
"आबासाहेब, तुम्ही आभाळाच्या डोळ्यांनी पाहात असाल मला, पण मला तुमचं आभाळाएवढं रुप पाहायला डोळेच राहिले नाहीत हो. आग्र्याहुन येताना तुमचा हात विश्वासाने हातात घेऊन म्हणालो होतो, "आमची फिकीर करु नका आबासाहेब, आम्ही सुखरुप गडावर पोहोचु". तसा तुम्हीही माझा विश्वासाने हात हाती घ्याल का आबासाहेब? पण ते हातही उरले नाहीत आता. अन् तुम्हाला "आबासाहेब, अशी साद घालायला जीभही उरली नाही हो. पण एक सांगतो आबासाहेब, रक्ताचा अभिषेक घालूनच स्वराज्याचं मंदीर पवित्र होणार असेल आणि शिवपूत्र म्हणून अशीच मृत्युशी ओळख होणार असेल, तर मी रायगडीच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेन, हजारवेळा जन्म दे,
पण शिवपूत्र म्हणूनच दे.......
*जगायचं कसं हे तुम्ही जगाला शिकवलत आणि*
*मरायच कसं हे मी शिकवेन !*
जगदंब 📿
BY छत्रपती शिवाजी महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj | Chattrapati Sambhaji Maharaj | HD WhatsApp Instagram Status Maharashtra

Share with your friend now:
tgoop.com/srimantyogishivajimaharaj/10891