Telegram Web
गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या ऊपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते आणि मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीमुळे आयुष्य रंगतदार व आनंदी होते.
@suvichar_marathi
तुमचा मूड खराब असेल तर वाईट बोलू नका, कारण तुम्हाला तुमचा विचार बदलण्याची संधी मिळेल पण शब्द बदलण्याची नाही.
@suvichar_marathi
राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगली असतात.
@suvichar_marathi
जीवनात स्वतःला न पटणार्‍या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.
@suvichar_marathi
वेळ ही आपल्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवायचं की जिथे आपल्याला जास्त परतफेड मिळेल.
@suvichar_marathi
जीवनात येणारी परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थिती शिवाय दुसरं कोणीच शिकवू शकत नाही.
@suvichar_marathi
माणूस कधीही आपण समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही, पण समोरचा आपल्याशी कसं वागत आहे ते नेहमी लक्षात ठेवतो.
@suvichar_marathi
प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरुन त्यांची पात्रता कळते तुमची नाही.
@suvichar_marathi
जीवनात बऱ्याच वेळा स्वप्नांचे अश्व लगाम घालून काबूत ठेवावे लागतात कारण बरीच स्वप्ने जबाबदारीकडे गहाण ठेवूनच वाटचाल करावी लागते.
@suvichar_marathi
आपल्या जवळ एखादी गोष्ट नाही या भावनेने दुःखी होण्यापेक्षा, जे इतरांजवळ नाही ते आपल्या जवळ आहे या भावनेने आनंदी रहा.
@suvichar_marathi
आयुष्यात कोणतीच व्यक्ती व्यस्त नसते फक्त आपण किती महत्त्वाचे आहोत त्यानुसार आपल्याला ती व्यक्ती वेळ देत असते.
@suvichar_marathi
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात पण खूप लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
@suvichar_marathi
चांगल करूनही काही लोकं तुम्हाला वाईटच समजत असतील तर तो तुमचा दोष नाही कदाचीत तुम्हाला ओळखण्याइतपतचा बुध्यांक त्यांच्याकडे नाही.
@suvichar_marathi
मोठे निर्णय घेताना भीती वाटणे साहजिकच आहे पण केवळ भीतीमुळे निर्णय न घेणे मात्र चुकीचे आहे.
@suvichar_marathi
माणूस कधीही आपण समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही पण समोरचा आपल्याशी कसं वागत आहे ते नेहमी लक्षात ठेवतो.
@suvichar_marathi
वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा भविष्य फार धूर्त आहे ते फक्त आश्वासन देतं खात्री नाही.
@suvichar_marathi
देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होत मग तो मान असो प्रेम असो किंवा वेळ.
@suvichar_marathi
बऱ्याचदा पाहिजे तसं आयुष्य जगता येतं नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे गहाण ठेवावे लागतात.
@suvichar_marathi
सरळ सरळ जे आहे ते सांगण्याचं धैर्य आपल्यात हवं त्यातून जी नाती टिकतील ती टिकतील जे सोडावं लागेल तिथं इलाज नाही.
@suvichar_marathi
सकारात्मक राहिल्यास आलेली संकटे, समस्या सगळ्यांचा सामना निर्भयपणे करता येतो.
@suvichar_marathi
2024/09/22 06:27:17
Back to Top
HTML Embed Code: