Telegram Web
वयाच्या १७ व्या वर्षी आयुष्यातील पहिले रक्तदान बच्चू भाऊने केले. भाऊ कडुन प्रेरणा घेऊन मागील ३५ वर्षात प्रहारच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हि चळवळ अखंडित चालु ठेवली.
रक्तदान जणू प्रहारचा आत्मा आहे. आज या रक्तदान चळवळीचा प्रवास शब्दबद्ध करुया. यातुन येणार्‍या अनेकांना प्रेरणा मिळणार. याकरीता आपण घेतलेले रक्तदान शिबीर ई. विषयी माहीती व फोटो [email protected] या ईमेल आयडीवर पाठवावी...
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान, सोलापूर
बुधवार दि. २० सप्टेंबर २०२३
कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक सभागृह, श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना कुमठे, होटगी रोड, सोलापूर
आ. बच्चू कडु यांचे ऑफीशियल WHATSAPP चैनल खालील लिंक वर क्लिक करुन जाॅईन करा! :
https://whatsapp.com/channel/0029Va4d12QD8SDzSx0qoc1B
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान, धाराशिव
गुरवार दि. २१ सप्टेंबर २०२३
छायादिप लॉन्स (मंगल कार्यालय)
छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव
भारताचा स्वातंत्र्यलढ्यात जीवाची बाजी लावलेल्या अज्ञात क्रांतीवीरामध्ये अग्रणी नाव येतं भागोजी नाईक यांचं. १८०४ साली नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे इथे एका भिल्ल कुटुंबात जन्मलेल्या भागोजी नाईक यांचे वडील कोतवाल होते मात्र घरात अठराविश्वे दारिद्र्य होतं. शिक्षण घेण्याची ऐपत नव्हतीच. वासराचा जीव वाचवण्यासाठी फक्त कुऱ्हाडीच्या जोरावर वाघ मारणाऱ्या या तरुणाला इंग्रज कंपनी सरकारने पोलिसात नोकरी दिली. पुढे ते अधिकारी देखील झाले. पण आपल्याच लोकांवर कारवाया करणे त्यांना पटले नाही. इंग्रज अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांना एक वर्ष तुरुंगात देखील राहावे लागले. पण ते तुरुंगातून बाहेर पडले स्वातंत्र्याची शपथ घेऊनच. भागोजींनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले आणि अनेक लढाया जिंकल्या. अखेर इंग्रजांनी फितुरी करुन सांगवी इथल्या देवनदी व गोदावरीच्या संगमावर भागोजींचा ठाव घेतला. ११ नोव्हेंबर १८५९ ची काळरात्र ठरली आणि त्यांना वीरमरण आले.
*महात्मा फुलेंच्या विचारांचा खरा वारसदार आमदार बच्चू कडु*

इंग्रजांच्या गुलामी राजवटीत शेतकऱ्यांची व्यथा दाखवण्यासाठी इंग्रज राणी समोर फाटके मळकट वेष कपडे अंगात परिधान करून गेलेले महात्मा ज्योतिबा फुले व शेतकऱ्याचा आसूड लिहून शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना मांडत त्याना जसगे करण्यासाठी काम करणारे महात्मा ज्योतिबा फुले..! आज त्या महामानवाची पुण्यतिथी...! स्वातंत्र मिळून ७० वर्षाचा काळ गेला गोरे इंग्रज गेले पण शेतकऱ्यांची व्यथा बदलली नाही.

ही व्यथा आज सभागृहात आक्रमकपणे सरकार पुढे सभागृहात शेकडो वेळा मांडणारा महात्मा फुलेंच्या विचारांचा खरा वारसदार म्हणजे आमदार बच्चू कडू
सी. एम.( मुख्यमंत्री) ते पि. एम.(प्रधानमंत्री) नागपूर ते वडनगर गुजरात अशी महात्मा फुले शेतकरी आसूड यात्रा काढणारे आमदार बच्चू कडू हेच खरे महात्मा फुले यांच्या विचारांचे खरे वारसदार वाटतात.

आज ज्योतिबा फुलेंची पुण्यतिथी त्या निमित्ताने चांदुर बाजार येथे कडू यांनी मोठ्या आरोग्य तपासणी व उपचार शीबिराचे आयोजन करून आदरांजली वाहिली ही खरी पुण्यतिथी आरोग्य सेवा करताना कधीच जात धर्म न पाहता सेवा हाच धर्म मानणारा खरा फुलेंच्या विचारांचा वारसदार म्हणजे आमदार बच्चू कडू

मतदार संघात कोणी मत दिले कोणी दिले नाही हे कधीच न पाहता मतदार संघातील सर्व गावांना विकासाच्या प्रवाहात आणणारा शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून सिंचन प्रकल्पास मंजुरी मिळवणारा व शेतकरी हा कोण्या एक जातीचा व धर्माचा असू शकत नाही.मतदार संघात रस्त्याचे मजबूत जाळे विनणारा ज्या रस्त्याने सर्व जाती धर्माचे लोकं जातात.माणुसकी हाच धर्म हे सूत्र अंगिकरणारा'कोरोना' च्या भीषण महामारीत गरीब गरजू साठी अन्न छत्र सुरू करणारा समतेचा पुजारी व फुलेंच्या विचारांचा वारसदार म्हणजे आमदार बच्चू कडू

आपल्या प्रहार संघटनेत हजारो स्व जातीय कार्यकर्ते असतांना केवळ संघटनात्मक काम पाहून जिल्हा प्रमुख,मराठवाडा संपर्कप्रमुख व महाराष्ट्र संपर्क प्रमुख म्हणून माळी(ओबीसी) समाजाला पदाची जवाबदारी सोपविणारा कोणातच जात न शोधणारा व दिव्यांगाच्या दुःखावर अहोरात्र फुंकर घालणारा ओबीसी ला स्वतंत्र घरकुल योजना द्या ही मावणी करणारा पहिला लोकप्रतिनिधी व फुलेंच्या विचारांचा खरा वारसदार म्हणजे आमदार बच्चू कडू

प्रमोद कुदळे
(माजी संपर्क प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र)
Media is too big
VIEW IN TELEGRAM
बच्चु कडुंच्या 'अदालतीत' कसे होतात फैसले?
ABP माझा स्पेशल रिपोर्ट
ही निवडणूक नसुन जनआंदोलन आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे..
बुधवार ०३ एप्रिल २०२४
दु.०१ वाजता
दिव्यांग बांधवासाठी आनंदाची बातमी...
2025/02/05 14:11:53
Back to Top
HTML Embed Code: