Telegram Web
श्रमकऱ्यांचा कैवार घेऊन अण्णा भाऊ साठेअन्यायाविरुद्ध सातत्याने लढत राहिले. हे जग बदलायचे असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आपल्याला जावे लागेल. हे सांगताना अण्णा भाऊ साठे म्हणतात, '"हे जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव.'"

अण्णा भाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ तर आईचे नाव वालुबाई होते. घरात प्रचंड गरिबी. दारिद्र्य हाच त्यांचा सखा नि सोबती होता. आण्णा भाऊंना वाटायचे आपण खुप शिकावे, म्हणून ते शाळेत गेले. गुरुजींनी त्यांना वर्गात बसू दिले नाही. एक दिवस ते वर्गाबाहेर बसूनच आत गुरुजी काय शिकवतात हे बाहेर बसून ऐकत होते. दुसऱ्या दिवशी धाडस करून ते वर्गात गेले. गुरुजींनी त्यांना दांडक्याने मारले. शिक्षण घेण्याच्या आशेने शाळेत गेलेल्या आण्णा भाऊंना मार खाऊनच घरी यावे लागले. ते फक्त दीड दिवस शिकले. पण पुढे जाऊन त्यांनी अक्षर ओळख करून घेतली आणि त्यांची प्रतिभेची गाडी सुसाट सुटली. गुणवत्ता आणि प्रतिभा ही कुणाची मक्तेदारी नाही. हे साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी जगाला दाखवून दिले.

वयाच्या दहाव्या वर्षी अण्णा भाऊ साठे आणि त्यांच्या परिवाराला वाटेगाव वरून मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे वाटेगाव ते मुंबई असा चारशे किलोमीटरचा प्रवास अण्णा भाऊंनी त्यांच्या परिवारासह पायीच सुमारे दोन महिने केला. उदरनिर्वाहासाठी कोळसे वेचायचे, झाडू मारायचा, ओझे उचलायचे; असे करत करत त्यांनी मुंबई गाठली. ज्या अण्णा भाऊंना वयाच्या दहाव्या वर्षी मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत, त्याच अण्णा भाऊ साठे यांना रशियन सरकारने विमानाने बोलावून रशियामध्ये त्यांचा मोठा आदर सन्मान केला. अण्णा भाऊ साठे म्हणजे रशियन जनतेच्या गळ्यातील ताईत होते. त्यांची साहित्य संपदा रशियन भाषेमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

अण्णा भाऊ साठे आपल्या शिष्टमंडळासह जेव्हा रशियामध्ये पोहोचले, तेव्हा तेथील शासनातील अधिकाऱ्यांनी त्यांना विचारले, "तुम्हाला काय पाहायला आवडेल. तेव्हा त्यांच्या शिष्टमंडळातील डॉक्टर म्हणाले आम्हाला या ठिकाणची वैद्यकीय सेवा पाहायची आहे. लोकप्रतिनिधी म्हणाले या ठिकाणी शासन व्यवस्था कशी चालते ते पाहायचे आहे. वकील मंडळी म्हणाली या ठिकाणची न्यायव्यवस्था पाहायची आहे. संगीतक्षेत्रातील सहकारी म्हणाले या ठिकाणचे कला, नाट्य, संगीत पाहायचे आहे. अण्णा भाऊ साठे म्हणाले, "'या ठिकाणचा मला फुटपाथ दाखवा आणि फुटपाथवर गोरगरीब कसे जगतात ते मला पाहयचे आहे". रशियामध्ये जरी गेले, तरी उपेक्षित, वंचित, गरिबांची नाळ कधी तुटली नाही. अण्णा भाऊ साठे संवेदनशील मनाचे होते.

अण्णा भाऊ साठे रशियात जाण्यापूर्वीच त्यांची कीर्ती रशियात पोहोचली होती, ती त्यांच्या साहित्यामुळे. तेथे त्यांना छत्रपती शिवाजी राजांवर अभ्यास करणारे प्राध्यापक चेलिशेव भेटले. कॉम्रेड पी. ए. बारनिकोव भेटले. रशियन लोकांना मराठी भाषा शिकविणाऱ्या प्राध्यापिका ततियाना कातेनीना भेटल्या, बाकु याठिकाणी हमीद साहेब भेटले. हमीद साहेब अण्णा भाऊंना पाहिल्या पाहिल्या म्हणाले "शाहिरी अझीज." रशियामध्ये अण्णा भाऊ साठे यांनी ताश्कंद, मास्को, स्टालिनग्राड, बाकू, अझरबैजान इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार झाला.

मास्को येथील सत्काराला उत्तर देताना अण्णा भाऊ म्हणाले, 'छत्रपती शिवाजी राजांच्या मराठी मुलखातून मी या ठिकाणी आलो आहे. मास्कोमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी राजांचा जयजयकार करणारे अण्णा भाऊ साठे होते.'फकिरा कादंबरीतील फकिरा म्हणतो, "'ही तलवार शिवाजीराजांनी माझ्या पूर्वजांना दिलेली तलवार आहे." गणपतीला वंदन करणारा गण बदलून, छत्रपती शिवाजी राजांना वंदन करणारा गण अण्णा भाऊंनी आणला. ते म्हणतात,

"प्रथम मायभूच्या चरणा ।
छत्रपती शिवबा चरणा ।
स्मरणी गातो कवणा ।"

छत्रपती शिवाजीराजे वरती अण्णा भाऊंची नितांत श्रद्धा होती. सर्वसामान्य रयतेचा वाली छत्रपती शिवाजी महाराज हे अण्णा भाऊ साठे यांचे प्रेरणास्थान होते.

आपल्या देशातील सर्वसामान्य जनतेला शिक्षण मिळावे. उत्तम आरोग्य मिळावे. दारिद्र्यातून मुक्तता व्हावी. सर्वांगीण विकासासाठी शांतता असावी. ही साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांची मनोमन इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आजन्म संघर्ष केला. अण्णा भाऊ साठे हे जनमाणसाचे कैवारी होते. स्वतः दुःख भोगून इथल्या कष्टकरी श्रमकरी वंचितांना आनंद मिळावा.
यासाठी संघर्ष करणारा महायोद्धा म्हणजे साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे आहेत. दीड दिवस शाळां शिकणाऱ्या या महान साहित्यिकाने मराठी भाषेचा कैवार घेतला. जनमाणसांच्या मराठी भाषेला साहित्यात आणले. ज्या भाषेतील कलाकृती अनुवादित होते ती भाषा वृद्धिंगत होते. मराठी भाषेचा कैवार घेऊन मराठी भाषेला वृद्धिंगत करणाऱ्या या महामानवाची जयंती 'मराठी भाषा दिन' म्हणून जर साजरा झाला, तर निश्चितच मराठी भाषेचा आणि अण्णा भाऊंचा सन्मानच ठरेल. अण्णा भाऊनां जयंतीनिमत्त विनम्र अभिवादन 🙏💐
"'पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे"
आण्णा भाऊ साठे 🙏🏻💐

अप्रतिम रचना.....

माझी मैना गावावर राहिली !”
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
ओतीव बांधा | रंग गव्हाला |
कोर चंद्राची | उदात्त गुणांची |
मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची |

हसून बोलायची | मंद चालायची |
सुगंध केतकी | सतेज कांती |
घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची |
काडी दवन्याची |रेखीव भुवया |
कमान जणू इन्द्रधनुची | हिरकणी हिरयाची

काठी आंधल्याची | तशी ती माझी गरीबाची|
मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण |
नसे सुखाला वाण |
तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
1
5_6152162999340634462.pdf
316.1 KB
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❣️15 ऑगस्ट ❣️🇮🇳🇮🇳🇮🇳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
लिपिक टंकलेखक 2023

तुमची स्वतःची सर्व प्रक्रिया लवकर पूर्ण व्हायची इच्छा असेल तर तुमच्या आमदार/खासदार/नगरसेवक किंवा इतर प्रतिनिधी ला लवकरच कळवा.
➡️स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले. चिरंजीवी प्रसाद, राजेंद्र डहाळे, सतीश गोवेकर यांना 'राष्ट्रपती पोलीस पदक' प्रदान करण्यात आले, तसेच १७ पोलीस शौर्य पदक आणि ३९ पोलिसांना ‘पोलीस पदक’ प्रदान केले गेले.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✔️कृषी च्या 2⃣5⃣8⃣ जागा आयोगाला प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

✔️आता चेंडू आयोगाच्या कोर्टात

✔️सध्या तरी 25 ऑगस्ट वरच फोकस असावा कोर्टात
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MPW 40% & 50%.PDF
3.3 MB
♦️# ZP बुलढाणा DV आरोग्य सेवक 40% & 50%
2025/07/13 13:57:53
Back to Top
HTML Embed Code: