Telegram Web
#NCL
♦️खुल्या प्रवर्गातील महिलासाठी नॉन क्रिमीलेअर ची अट रद्द.
पावसाळी अधिवेशन आजपासून

...
पावसाळी अधिवेशनाबाबत मा. राज्यपाल रमेश बैस यांची अधिसूचना
महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
Forwarded from Gutte MPSC Academy (Gutte Madam)
5_6053283179920363522.pdf
312.8 KB
"मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण"  योजना..

लाभार्थी :  21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परिव्यक्त्या व निराधार महिला...
👉 हे वाचा आणि येथून पुढे असे काहीही उद्योग करून आयुष्य बरबाद करून घेऊ नका.. 🙏


❤️ आज दिनांक ९ जुलै २०२४ रोजी आयोजित इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान दुसऱ्या सत्रातील एका उमेदवाराने कौशल्य चाचणी सुरू असताना स्वतः CPU बंद केल्याचे आढळून आले आहे. उमेदवाराने केलेल्या त्या कृत्याची परीक्षा कक्षातील सीसीटीव्ही चित्रणावरून खात्री करण्यात आली आहे. टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या सूचनांमधील तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे संबंधित उमेदवाराच्या कृत्याची आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्यांचे विरुद्ध आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आषाढी एकादशीच्या सर्व विठू भक्तांना खूप खूप शुभेच्छा..!🙏❤️🚩
🛑 लडाख मध्ये समर क्षेपणास्त्र तैनात...
➡️ नव्या पर्यटन धोरणातून 18 लाख रोजगार निर्मिती होणार.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
➡️ राज्यातील 7 हजार कर्मचारी 20 वर्षांपासून कायम सवेच्या प्रतीक्षेत....

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️👉आदिवासी विकास विभागातील क्षेत्रिय कार्यालयातील पदांचा तपशील

♦️👉ही माहिती जून 2024 अखेरची आहे
♦️👉92 उपशिक्षणाधिकार्‍यांची नियुक्ती रखडली

♦️👉MPSC मार्फत ऑगस्ट 2017 मध्ये परीक्षा झाली होती
*साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक*

ज्यांच्या वाट्याला फक्त दीड दिवसाची शाळा आली त्याच साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यक्षेत्रात जागतिक स्तरावर स्थान मिळविले. त्यांची साहित्य संपदा जगातील सुमारे 22 भाषांत अनुवादित झालेली आहे.

त्यांची चित्रा, सुलतान या कादंबऱ्या रशियामध्ये घरोघरी वाचल्या जातात, तर त्यांनी लिहिलेला स्टॅलिनग्राडचा पोवाडा रशियातील घराघरात गावागावात आणि शाळा-महाविद्यालयात गायला जातो. इतका तो प्रेरणादायी आणि लोकप्रिय आहे. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी 15 पोवाडे, एक नाटक, दहा लोकनाट्य, एक प्रवास वर्णन, तेवीस कथा आणि सुमारे 40 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. इतका प्रतिभासंपन्न आणि बहुविध साहित्यिक मराठी भाषेत दुसरा झाला नाही.

प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात, 'अण्णा भाऊंच्या कादंबरीची तुलना करणारी भारतीय भाषात दुसरी कादंबरी नाही. अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीची तुलना रशियन कादंबरीकार दोस्तोएवस्की यांच्याशीच होऊ शकते. यावरून स्पष्ट होते की अण्णा भाऊ साठे हे केवळ मराठी भाषा, महाराष्ट्र, भारत या चौकटीमध्ये मावणारे व्यक्तिमत्व नसून, ते जागतिक स्तरावरचे साहित्यिक ठरतात.

अण्णा भाऊ साठे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. कष्टकरी, कामकरी, शेतकरी वर्गाच्या हक्क अधिकारासाठी ते लढले. मुंबईसह मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या वाणीने -लेखणीने शाहीर अमर शेख ,शाहीर गव्हाणकर यांच्यासोबत ढवळून काढला.

'माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहिली' ही त्यांची छक्कड खूप गाजली. त्यांची ही छक्कड मराठी भाषेचे वैभव आहे. अत्यंत निस्वार्थ भावनेने त्यांनी सर्वसामान्य वंचित वर्गाच्या हक्कासाठी लढा दिला.

बालपणापासून त्यांच्या वाट्याला अत्यंत हलाखीचे जीवन आले.ओझी वाहिली, कोळसा वाचला, गिरणीत झाडू मारला. पोटासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत. संकटाला संधी समजून त्यांनी लढाऊ वृत्तीने त्यावरती मात केली. आण्णा भाऊ साठे संकटात खचून जाणारे नव्हते. तर संकटाच्या नरडीवर पाय देऊन यशाची शिखरे गाठणारे अण्णा भाऊ होते.

गोरगरिबांचे दारिद्र्य नष्ट व्हावे, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. आण्णा भाऊ म्हणत, 'दारिद्र हे फार क्रूर असते, आणि ते नग्न असते. ते नष्ट झाले पाहिजे.' यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. त्यांनी पंजाब दिल्लीचा दंगा, बंगालची हाक या कलाकृतीच्या माध्यमातून शांततेचे आवाहन केले. अण्णा भाऊ साठे म्हणत, 'शांतता ही पवित्र बाब आहे. दंगल करून आपला प्रश्न सुटणार नाही, तर शांततेच्या मार्गानेच आपले प्रश्न सुटतील.' अशी त्यांची भूमिका होती. गरिबांना न्याय मिळावा, ही त्यांची प्रामाणिक भूमिका होती.

अण्णा भाऊ साठे हे महान प्रतिभावंत साहित्यिक होते. परंतु साहित्याचा उपयोग त्यांनी समाजपरिवर्तनासाठी केला. एखादा प्रसंग उभा करण्यात त्यांचा हातखंडा होता. अचूक वर्णन करून एखादी व्यक्ती किंवा घटना याचे चित्रण करण्यात त्यांचा हातखंडा होता. प्राचीन काळामध्ये जनमानसाच्या मराठी भाषेला गाथासप्तशती, मध्ययुगीन काळात चक्रधरांचे लीळाचरित्र, संत नामदेवांची गाथा, संत तुकारामाचे अभंग, आधुनिक काळात महात्मा फुले यांचे साहित्य आणि साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य कवेत घेत इंग्रजाळलेल्या काळात जनमाणसाची मराठी साहित्यात आणली. आजचे आधुनिक साहित्यिक म्हणजे आण्णा भाऊ साठे आहेत. त्यामुळेच त्यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन झाला पाहिजे. तो मराठी भाषेचा आणि आण्णा भाऊंचा ही सन्मान ठरेल

अण्णा भाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊ साठे असे आहे. आण्णा भाऊ साठे हे आधुनिक महाराष्ट्राचे तुकाराम आहेत. त्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, दारिद्र्य, विषमता यावरती कडाडून हल्ला केला. आज देखील आपल्या समाजामध्ये पृथ्वीची निर्मिती ईश्वराने देवाने केलेले आहे. जगाचा नियंता ईश्वरच आहे. हे सर्व जग सजीव सृष्टी ईश्वर चालवतो आहे. अशी अंधश्रद्धा आहे. परंतु आण्णा भाऊ साठे म्हणतात, 'पृथ्वी ही शेष नागाच्या फण्यावर तरलेली नसून ती कष्टकरी, श्रमकरी ,शेतकरी वर्गाच्या तळहातावर तरलेली आहे." श्रमकऱयांनी श्रम नाही केले तर धनदांडगे फक्त नोटा खाणार नाहीत.'
2025/07/13 06:27:03
Back to Top
HTML Embed Code: