tgoop.com/klakavy/4740
Last Update:
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
तूच सांग आयुष्या मी कसं वागावं
समजून जगावं की जगून समजावं
तूच सांग आयुष्या मी कसं वागावं
जुने अनुभव गाठीला घेत
नव्या अनुभवांना वेचावं
की कडू गोड क्षणांना वळचणीला टाकावं
की जुन्या नव्याची सांगड घालत आल्या क्षणाला जगावं
तूच सांग आयुष्या मी कसं वागावं
स्वतःशी प्रामाणिक राहावं की इतरांचं मन सांभाळावं
दुसऱ्याच्या मर्जीने वागावं तर स्वतःच्या वाटण्याचं काय करावं
की जे मनापासून वाटलं त्याच्या मागे जावं
तूच सांग आयुष्या मी कसं वागावं
कोण आहे मी, एक स्वतंत्र अस्तित्व
की फक्त इतरांनी घडवलेलं एक व्यक्तिमत्त्व
असाव्यात का स्वतःच्या व्याख्या माझ्या आयुष्याला
की काहीच अर्थ नाही मनापासूनच्या जगण्याला
की फक्त इतरांच्या अपेक्षापूर्तीचं साधन व्हावं
समजून जगावं की जगून समजावं
तूच सांग आयुष्या मी कसं वागावं
✒️सचिन सवाई
@klakavy
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
BY मराठी साहित्य
Share with your friend now:
tgoop.com/klakavy/4740