tgoop.com/mathsguide/3344
Last Update:
प्रति,
मा.-----------------
------------------------
*अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान* चे वतीने आणि अक्षरमंच प्रकाशनाचे माध्यमातून आजपर्यंत २०० हून अधिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . यामध्ये प्रामुख्याने शिक्षक साहित्य संमेलन , बालसाहित्य संमेलन , बालजल्लोष , पोएट्री मॅरेथॉन , वाचन प्रेरणादिन , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय काव्यसंमेलने यांचा समावेश आहे. मुलांना वाचन प्रवृत्त करण्यासाठी विविध पुस्तके आणि विशेषांकाचे प्रकाशन आणि त्यावर आधारित संस्कार स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचा समावेश आहे. संस्थेच्या या उपक्रमांची दखल विविध वृत्तपत्रे , टिव्ही चॅनल आणि विविध रेकॉर्ड बुक यांनी घेतली आहे.
*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरामध्ये उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हा अमृत महोत्सव साजरा करताना देशाचे भावी आधारस्तंभ म्हणजे आजची भावी पिढी अर्थात विद्यार्थी आणि युवा वर्ग यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याची माहिती व्हावी आणि त्यानिमित्ताने वाचन संस्कृती वृध्दींगत व्हावी या हेतूने ' *क्रांतीलढा स्वातंत्र्याचा ' या पुस्तकाचे प्रकाशन* करण्यात आले आहे. या पुस्तकामध्ये क्रांतीलढ्याची गाथा कथा स्वरूपात मांडण्यात आली आहे. सदर पुस्तकावर आधारित स्पर्धा आयोजित केली आहे. सदर पुस्तकाची
*ई बुक प्रत* सोबत पाठविली आहे. *विद्यार्थी , युवा वर्ग आणि खुला गट यासाठी स्पर्धा आयोजित केली आहे.*
*क्रांतीगाथा स्वातंत्र्याची* या पुस्तकाच्या *पान ५८ व पान ५९ वर प्रश्नपत्रिका आणि पान ६१ व ६२ वर उत्तरपत्रिका देण्यात आली आहे तसेच पान ६३ वर स्पर्धा सूचना देण्यात आल्या आहेत* स्पर्धा समिती सदस्य *सौ. गायत्री नेमाडे- 9403827752* यांचेकडे आपण उत्तरपत्रिकेची प्रिंट काढून त्यावर उत्तरे लिहून उत्तरपत्रिकेची PDF ( फोटो) व्हॉट्सअप करावी किंवा हार्ड कॉपी जमा करावी.
स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या *सर्व विद्यार्थ्यांना रंगीत ई सहभाग प्रमाणपत्र* प्रदान करण्यात येणार आहे. तसेच *पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा *सन्मानसोहळा नोव्हेंबर/ डिसेंबर मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.* सदर पारितोषिके *शालेय स्तरावर तसेच राज्यस्तरावर प्रदान करण्यात येतील.*
सदर उपक्रम सर्वांसाठी *विनामूल्य* आयोजित करण्यात आला आहे . हा उपक्रम केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील आणि विदेशातील मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्याना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. आपल्या शाळेतील *५०० विद्यार्थी* उपक्रमात सहभागी झाल्यास संबंधित *शिक्षक यांना सन्मानपत्र आणि १०००* पेक्षा अधिक विदयार्थी सहभागी झाल्यास *सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.* स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची गटनिहाय यादी व उत्तरपत्रिका *आपण स्पर्धा प्रमुख सौ गायत्री नेमाडे - 9403827752 यांच्या whatsapp वर दि १५ सप्टेंबर , २०२२ पर्यंत जमा करावी.*
लोभ आहेच , वृध्दींगत व्हावा.
आपले विनीत
डॉ. योगेश जोशी
अध्यक्ष: अक्षरमंच प्रतिष्ठान 9757077614
हेमंत नेहेते
सचिव: अक्षरमंच प्रतिष्ठान
8779644992
BY mathsguide
Share with your friend now:
tgoop.com/mathsguide/3344