Telegram Web
Forwarded from B K
Forwarded from B K
❤️शब्द मनाचे❤️
Photo
नक्की पूर्ण वाचा..आपला भारत देश हा कृषिप्रधान देश,त्यामुळे सर्वसामान्य माणूस शेती ह्या व्यवसायांवर अवलंबून असतो,म्हणजेच आपली थेट मातीशी नाळ टिकून असणारी आपली संस्कृती आपल्या परंपरा🚩🙏..त्यात महाराष्ट्र म्हणजे जगतविख्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज,तुकाराम महाराज अशा अनेक संतांची भूमी तसेच छ.शिवाजी महाराज छ.संभाजी महाराज अशा अनेक वीरांची भूमी लाभेलली पवित्र माती..ह्याच महाराष्ट्राने जगाला सांप्रदायची,भक्तीची ओळख जगाला करून दिली..😇
  आषाढ एकादशीचा,वारीचा सोहळा पाहण्यासाठी भारतातूनच नाहीतर परदेशतूनही अनेक लोक येतात आणि ह्या इथल्या संस्कृतीचा आदर्श घेतात,सोहळ्यात दंगून जातात,हीच आपल्या संस्कृतीची,सांप्रद्याची ओळख..🚩ह्या सोहळ्यात लिंग,लहानमोठा जात,धर्मभेद असा कोणताही भेदभाव नसतो.. सर्वांनाच पांडुरंगाच्या पावलांचे दर्शन घेण्याची संधी मिळते म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणतात'सकळाशी येथे आहे अधिकार|🚩 कलियुगी उद्धार हरीच्या नामे॥आपल्या संस्कृतीची,परंपरेची जपवणूक आपणच करणे ही काळाची गरज आहे..व्यसनांपासून,वाईट गोष्टींपासून,प्राणीमात्रांवर दया करायला शिकवणारी,मत्सर,भेदभाव निर्मुलन करायला शिकवणारी ही सांप्रदायाची शिकवण🙏😇तरुणांनी चुकीच्या गोष्टींचा नाद करण्यापेक्षा योग्य दिशा दाखवणारी आपली परंपरा, संस्कृती.तरुणपणी परमार्थाची शिकवण अंगी लागलेली कधीच वाया जात नाही..असे म्हणले जाते जिथे विज्ञान शेवट होतो तिथे अध्यात्माची सुरवात होते.आयुष्यात शिक्षण,विज्ञान आणि आध्यात्म ह्या गोष्टींची सांगड घालता आली तर नक्कीच आयुष्य आनंदी,समाधानी बनते..😇पांडुरंग सर्वांना सुखी,आरोग्यदायी आयुष्य देवो बळीराजाच्या,विद्यार्थ्यांच्या कष्टाला नक्की फळ देवो,भेदभाव संपून जावो हीच परमेश्वरास प्रार्थना🙏😇
........ 😇🌺🙏.......
लेखन-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Wha)
Insid- bharat_53_
प्रतिक्रिया कळवा व आवडल्यास शेयर करा
3
Forwarded from Sushant Kulkarni ( महाराष्ट्र शासन 🚨) Assistant Secretary parliament 🚨
UPSC MPSC तयारी आणि देवाला मानणे – एक समतोल साधणारा प्रवास

UPSC MPSC ही परीक्षा केवळ ज्ञानाची नव्हे तर संयम, चिकाटी आणि आत्मविश्वासाची कसोटी असते. अशा कठीण वाटचालीत जेव्हा एखादा विद्यार्थी तयारीला लागतो, तेव्हा त्याच्या मनात अनेक विचार, प्रश्न आणि चिंता सुरू होतात. अभ्यास, अपयश, समाजाचा दबाव, आणि स्वतःवरील अपेक्षा यामुळे मानसिक थकवा येतो. या प्रवासात बऱ्याच जणांना आधार वाटतो तो म्हणजे "देवावर विश्वास".

देव म्हणजे काय?
देव हा प्रत्येकासाठी वेगळा असतो — कुणासाठी विठोबा, कुणासाठी बुद्ध, तर कुणासाठी आत्मविश्वासच एक देव. UPSC MPSC च्या प्रवासात देव म्हणजे एक अशी शक्ती असते जी संकटाच्या वेळी मनाला शांत ठेवते. कोणत्याही धर्माचा असलो तरी त्यामागे असलेली श्रद्धा आणि सकारात्मकता हीच खरी शक्ती ठरते.

प्रयत्न तुमचे, पण आधार देवाचा: देवावर विश्वास ठेवणं म्हणजे आपली जबाबदारी टाळणं नव्हे. 'मी फक्त अभ्यास करतो, बाकी देव बघेल' असं नको. उलट, 'मी माझं शंभर टक्के देतो, बाकी काही अडचण आली तर त्याचा आधार आहे' ही भावना हवी.

संकटात आधार: अपयश, अभ्यास न होणे, एकटेपणा – हे सगळं दररोज वाट्याला येतं. अशा वेळी देवाची पूजा, ध्यान, जप, किंवा फक्त प्रार्थना हे मन शांत करतं. हेच UPSC MPSC च्या मानसिक लढाईत महत्वाचं ठरतं.

अभ्यासात नियमितता: जसा दररोज देवाची पूजा करतो, तसा दररोज अभ्यास करावा लागतो. 'Consistency is divine' – हे सूत्र लक्षात ठेवा.

भक्ती आणि अभ्यास – समतोल कसा साधायचा?
पहाटेचा अभ्यास आणि प्रार्थना: अनेक टॉपर सांगतात की सकाळी लवकर उठून प्रार्थनेनंतर अभ्यास केल्याने एक वेगळी ऊर्जा मिळते.

एखादा दिवस वाईट गेला तरी निराश होऊ नका: त्या दिवशी देवाशी संवाद साधा. लिहून काढा की काय चुकलं, आणि पुढे काय सुधारता येईल.

देवळात जाणं = मानसिक ब्रेक: सतत अभ्यास करून मेंदू थकल्यावर देवळात जावं, तिथली शांती आणि सकारात्मक वायब्रेशन मनाला नवसंजीवनी देतात.

शेवटी काय महत्वाचं आहे?
देवावर विश्वास ठेवा, पण स्वतःवर अधिक विश्वास ठेवा. देव तुमचं स्वप्न पूर्ण करणार नाही, पण तो तुमच्यात ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद नक्कीच निर्माण करेल.

UPSC MPSC ही तपश्चर्या आहे. देव हा त्या तपश्चर्येतील एक मानसिक साथीदार. आणि त्या संगतीतूनच तुमचं यश घडेल.

शुभेच्छा!
तुमचा अभ्यास आणि श्रद्धा दोन्ही सच्च्या असल्या की, यश तुमच्या दाराशी येणारच! 🌟📚🙏
✍️ सुशांत कुलकर्णी
(कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई)
@sushant_kulkarni_official
Insta ID @Dr.Sushant_4848
🌅 " आजचे सुविचार "

1) नेहमी लक्षात ठेवा. उघडण्यासाठी दुसरे दार तयार ठेवल्याशिवाय निसर्ग पहिले दार कधीच बंद करत नाही.

2) तुम्ही जे आत्तापर्यंत करत होता तेच पुन्हा कराल तर तुम्हाला तेच मिळेल जे आत्तापर्यंत मिळत होतं.

3) आधी कधीच न मिळवलेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेलं करावं लागेल.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ♥️शब्द मनाचे♥️
  Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
2👍1
आपुलकीचे चार शब्द मनापासुन बोलता यायला हवे, आयुष्यात शुभचिंतकाची कमतरता भासत नाही.
@rutuja_writes1203
#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache
👍4
Forwarded from Sushant Kulkarni ( महाराष्ट्र शासन 🚨) Assistant Secretary parliament 🚨
"सपनो के खातीर खुद को दिया,
प्रत्येक यशस्वी प्रवासामागे एक संघर्षाची कथा लपलेली असते. माझ्या प्रवासाची सुरुवातसुद्धा अगदी सामान्य होती—एक सामान्य कुटुंब, सामान्य स्वप्नं आणि असामान्य इच्छाशक्ती. पण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मी एक मोठा निर्णय घेतला… स्वप्नांच्या खातीर मी स्वतःलाच गमावलं.

✦  एक दिवस स्वप्न पाहिलं… "मला अधिकारी व्हायचंय." त्याक्षणी हे स्वप्न फक्त एक विचार होता, पण हळूहळू ते माझं ध्येय बनलं. घरच्यांची परिस्थिती मध्यमवर्गीय, साधेच जीवन, पण मनात मोठं स्वप्न.

लोक हसले, काहींनी तर टोकून सांगितलं – "इतकं सोपं नसतं रे अधिकारी होणं!" पण मी ठरवलं होतं – सोपं नसलं तरी अशक्य नाही.

✦  या प्रवासात सगळ्यात मोठं गमावलं ते म्हणजे – "स्वतःला."

मित्रांचे फोन बंद झाले, कारण मी पुस्तकं उघडली होती.

सण-उत्सव टाळले, कारण अभ्यास जास्त महत्त्वाचा होता.

सोशल मीडिया सोडलं, कारण मी स्वतःला शोधत होतो.

नातेसंबंध तुटले, पण स्वप्नांशी मी नातं जोडलं.

लोक म्हणायचे – "तू हरवला आहेस."
मी म्हणायचो – "हो, पण माझ्या ध्येयात हरवलोय!"

✦ रोज सकाळी उठून स्वतःला एकच गोष्ट आठवण करून द्यायचो –
"एक दिवस याच मेहनतीचं फळ मिळेल."

झोपेवर मात केली

नैराश्यावर विजय मिळवला

अपयश झेललं

तरीही चालत राहिलो…

कारण माझ्या मनात स्पष्ट होतं – "आज नाहीतर उद्या, पण मी अधिकारी होणारच!"

अधिकारी. या पदावर पोहोचताना आनंद आहे, अभिमान आहे, पण त्याचबरोबर एक शांतीसुद्धा आहे –
कारण मी स्वतःला गमावून हे स्वप्न जिंकलं आहे.

आज जेव्हा लोक म्हणतात, "भाग्यवान आहेस रे!"
तेव्हा मी म्हणतो – "भाग्य नव्हतं, फक्त न ठरवलेली त्यागाची तयारी होती."

स्वतःला हरवणं वाटतं त्याग, पण जेव्हा ते हरवणं स्वप्नासाठी असतं… तेव्हा त्याचं नाव असतं – "यश!"
आणि आज मी अभिमानाने म्हणतो –
"सपनो के खातीर खुद को दिया, इसीलिये आज मैं एक अधिकारी हूं!"
✍️ सुशांत कुलकर्णी
(कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई)
@sushant_kulkarni_official
Insta ID @Dr.Sushant_4848
14
जीवनात ना सर्वांसमोर मनसोक्त हसायचं मात्र एकांतात मन हलकं होईस तोवर रडायचं कारण आता जग उलट झालेलं आहे म्हणजे जेव्हा आपल्याला आधाराची खूप गरज असते तेव्हा साथ द्यायला कोणीचं तयार होतं नाही पण एकदा आपण यश प्राप्त केलं की शकंडो जण सोबतीला उभे राहतात म्हणूनचं आयुष्यात एक अशी व्यक्ती मिळवा की तिच्याकडे मन मोकळं करून रडता येईल कारण सुखात तर सर्वचं सहभागी होतात मात्र आपलं दुःख व्यक्त करायला कोणी तरी आपलंसं आसवं लागतं,,बरोबर ना!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
2👍2
🌅 " आजचे सुविचार "

1) तुम्ही कितीही बोला, समोरचा तेवढंच ऐकतो जेवढं त्याला ऐकायचं असतं विषय जेव्हा पैशांचा येतो तेव्हा आपलेही आपले राहत नाहीत..!

2) आपण कुणासाठी कधीच महत्वाचं नसतो, महत्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज. 'गरज संपली'..!! नातं संपल'..!!!

3) ना उंची मोठी, ना श्रीमंती मोठी, ना खुर्ची मोठी, ना राजक्रांती मोठी जो माणसाच्या सुख दुःखात पाठीशी उभा राहतो, जगात तीच व्यक्ती सर्वात मोठी.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ♥️शब्द मनाचे♥️
 Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
👍21
गुरुंचं अस्तित्व म्हणजे आकाशातलं अढळतारं,
ते चुकू देत नाही, नेहमी दुरून पण चमकत राहतं..!
@rutuja_writes1203
#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache
👍2
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वरं ।
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः ।।



आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरलेल्या गुरुजनांना नमन आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache
4
Forwarded from Sushant Kulkarni ( महाराष्ट्र शासन 🚨) Assistant Secretary parliament 🚨
गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा – माझे पहिले गुरु : माझे आई-वडील
गुरु म्हणजे केवळ शाळेतील शिक्षकच नव्हे, तर जीवनाची खरी दिशा दाखवणारा प्रत्येक व्यक्ती. आणि माझ्या आयुष्यातील पहिले गुरु म्हणजे माझे आई-वडील. त्यांनी मला आयुष्य दिलं, जगणं शिकवलं आणि माणूस म्हणून घडवलं.
आई म्हणजे ममतेचं आणि सहनशक्तीचं दुसरं नाव. तिनं बोट धरून चालायला शिकवलं, शब्द शिकवले, जगाच्या रस्त्यावर माझं पहिलं पाऊल टाकायला शिकवलं. तिनं कधी भूक विसरून मला खाऊ घातलं, कधी झोप न लागता माझ्या तापावर रात्रभर जागल्या. तिचं प्रत्येक कृती म्हणजे एक अनोखा संस्कार होता.
वडील म्हणजे शिस्त, जबाबदारी आणि आदर्शाचं मूर्त रूप. ते कधी बोलून दाखवत नाहीत, पण त्यांच्या प्रत्येक कृतीत माझ्यासाठी प्रेम असतं. त्यांच्या कष्टाच्या घामात माझं भवितव्य रुजलेलं आहे. त्यांनी मला संकटात खंबीर राहायला शिकवलं, अपयशातून यशाकडे वाट चालायला शिकवलं.
आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा गुरूंचं स्मरण केलं जातं, तेव्हा माझ्या मनात पहिल्यांदा नाव येतं आई-बाबांचं. तेच माझं दैवत, तेच माझं सर्वस्व. त्यांनी मला फक्त शिकवलं नाही, तर आयुष्य जगायला योग्य मूल्यं दिली, योग्य विचार दिला आणि चांगलं माणूस बनवलं.
🙏 आई-वडीलांच्या पायांशी माझं नतमस्तक प्रणाम.
"आई-वडील म्हणजे देव नाहीत, तर देवांचा साक्षात आशीर्वाद असतात."
✍️ सुशांत कुलकर्णी
(कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई)
@sushant_kulkarni_official
Insta ID @Dr.Sushant_4848
6
Forwarded from ओम sm शेळके
सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐🌹🙏🏻
मला आयुष्य खूप लोकांनी ज्ञान दिलं मार्गदर्शन केल मला योग्य ते मार्गदर्शन केलं ते माझ्या जीवनाच्या आतापर्यंतच्या टप्प्यात सतत कामी आलं मात्र माझ्यासारख्या अदज्ञानी व,अपंग व्यक्तीला ज्ञानी बनवण्याचं काम ज्यांनी केलं ते माझे आईवडील माझे सर आणि माझी जिवलग मैत्रीण♥️🙏🏻या चार लोकांनी माझ्या जगण्याला अर्थ दिला त्यामुळे थोडी का होईना माझी स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करू शकतो त्याबद्दल मी त्यांच्या आयुष्यभर ऋणी राहील या कलियुगात देव आहे की नाही मला माहिती नाही या चार व्यक्तीमुळें मी तो साक्षात अनुभवला♥️💯🙏🏻!,,,


एकमन#लेखक
@Ommshelke
1👍1
Forwarded from Sushant Kulkarni ( महाराष्ट्र शासन 🚨) Assistant Secretary parliament 🚨
गुरुपौर्णिमा…
हा दिवस आला की मनात एक वेगळीच हलचल होते. पूर्वी प्रत्येक गुरुपौर्णिमेला मी अगदी पहाटे उठून, हातात आरतीचं थाळं घेऊन त्यांच्या पायांवर डोकं ठेऊन आरती करत असे. त्यांच्या डोळ्यातलं प्रेम, हातातला आशीर्वाद, आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान… त्या क्षणातच माझं संपूर्ण विश्व सामावलेलं होतं.

पण आता... गेली दोन वर्षं झाली, त्या पायांना स्पर्श करता येत नाही, त्या डोळ्यांत पाहता येत नाही, त्या शब्दांना ऐकता येत नाही… माझे आईबाबा देवाघरी गेले… कायमचे.

आजही गुरुपौर्णिमा आली की माझ्या हातातील थाळ आणि आई बाबांचा पाय शोधतो पण काहीच सापडत नाही. चारही बाजूंना शांतता… आणि मनात अनंत आवाज. हृदयात अजूनही त्यांच्या "आशीर्वाद देतो" या शब्दांचा प्रतिध्वनी होत राहतो.

आई… जिच्या मांडीवर डोकं ठेवून मी सगळं विसरत असे.
बाबा… ज्यांच्या सावलीत मी स्वतःला सुरक्षित समजत होतो.
ते दोघंही आता फक्त आठवणीत उरले आहेत.

पण मला माहीत आहे… ते अजूनही माझ्या पाठीशी आहेत. त्यांच्या संस्कारांनी, त्यांच्या शिकवणीने आणि त्यांच्या प्रेमानेच तर आज मी आयुष्याच्या वाटचालीत ठाम उभा आहे.

आज त्यांच्या छायाचित्रासमोर आरती केली, पण हृदय मात्र पुन्हा त्या पायां पाशी झुकलं… त्या पायांचा स्पर्श नाही मिळाला तरीही आशीर्वाद मिळाला, कारण त्या आत्म्याचं आशीर्वादस्वरूप प्रेम माझ्यासोबत आहे.

आई-बाबा… तुमच्याशिवाय ही गुरुपौर्णिमा अपूर्ण आहे…
पण तुमच्या आठवणींच्या सावलीत मी अजूनही तुमचं लेकरू आहे…
तुमच्या प्रेमात, तुमच्या शिकवणीत, आणि तुमच्या आशीर्वादातच माझं आयुष्य अजूनही फुलतंय… 🙏💔
✍️ सुशांत कुलकर्णी
(कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई)
@sushant_kulkarni_official
Insta ID @Dr.Sushant_4848
2
🌅 " आजचे सुविचार "

1) जेव्हा लोकांना तुमच्या मधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत तेव्हा, ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात..!!

2) कोणीही आपलं Creation चोरू शकत. पण आपलं Talent नाही. हो ना.

3) आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावचं लागत कारण चुकीपेक्षा व्यक्ती जास्त महत्त्वाची असते.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ♥️शब्द मनाचे♥️
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
3
माणसाला आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्याही आपोआप समजते..!!
#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache
4👍2
Forwarded from ❚█══❦𝘞𝘳𝘪𝘵𝘦𝘳 𝘈𝘣𝘩𝘪 ❦ ══█❚
༺ 𒆜गुरुपौर्णिमा विशेष 𒆜 ༻

आज गुरूपौर्णिमा आज सर्वांनी आपापल्या परिणे गुरूपौर्णिमा साजरी केली, आयुष्यात जेवढे गुरूवर्य लाभले त्या संगळ्यांना शुभेच्छा रूपी वंदन केले...

परंतू या सगळ्यांमध्ये सर्वांच्या आयुष्यात प्रत्येक पाऊलावर वेग वेगळे अनुभव देणारी मुख्य गुरू म्हणजे... वेळ 🕒

🍂या वेळेचे ही आपल्या आयुष्यात खूप मोठे स्थान आहे , कारण याचं वेळेन शिकवलं की आपलं कोण..? आणि परकं कोण..?

💯याचं वेळेन शिकवलं गरीब कोण आणि श्रीमंत कोण...!

🥀याचं वेळेन शिकवलं की वाईट वेळेत आपलं कोण, अणि स्वार्थी माणंस कोण...!

💫वेळेनेच दाखवून दिले सोबत काही घेऊन जाणार नाही कोण...!

💝रक्ताची नाती पण कधी कधी बोलतात की तुम्ही कोण... ?

वेळेनेच शिकवलं की आपल्याला की वेळेशिवाय आपलं आहे तरी कोण...!

🍁आपल्या चांगल्य वेळेशिवाय आपल्या जवळ आलं तरी कोण......?

म्हणून माझे या वेळेला सुद्धा शत शत नमन 🙏


@Writer_sonya
8
🌅 " आजचे सुविचार "

1) ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही. पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे.

2) विद्यार्थी तयार झाला की शिक्षक हजर होतो.

3) जेंव्हा माणूस एखाद्या गोष्टीसाठी वेडा होऊन जातो त्याला मदत करण्यासाठी, त्याला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी अक्षरश संपूर्ण सृष्टी पुढे सरसावते.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ♥️शब्द मनाचे♥️
  Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
2
कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा,
आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा..!💯
@rutuja_writes1203
#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache
👍31
अभिमानास्पद 🔥🔥

🚩छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले जागतिक वारसा घोषित 💐💐


#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache
4
Forwarded from Sushant Kulkarni ( महाराष्ट्र शासन 🚨) Assistant Secretary parliament 🚨
आज मी एक अधिकारी आहे, पण त्या पदापर्यंत पोहोचण्याआधी मीही तुमच्यासारखाच एक विद्यार्थी होतो… आणि खरी गोष्ट सांगायची तर अजूनही आहे. कारण मोठी झेप अजून बाकी आहे. स्वप्न अजून पूर्ण व्हायची आहेत आणि म्हणूनच आजही मी शिकतच आहे, झगडतच आहे.

जेव्हा मी विद्यार्थ्यांशी बोलतो, तेव्हा अनेकदा त्यांच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला येतं –
"सर, अभ्यास होत नाही", "मन लागत नाही", "कसं करावं काहीच कळत नाही".
मला हे ऐकून हसू येत नाही, उलट त्या क्षणी मी स्वतःला त्यांच्यातच पाहतो. कारण मीही तेच अनुभवलेलं आहे.

मीसुद्धा अभ्यास करताना थकलोय, रडलोय, एकटेपण अनुभवलेय.
माझ्यासमोरही प्रश्न होते – घरची जबाबदारी, आर्थिक अडचणी, अपयशाची भीती, आत्मविश्वास गमावणे...
पण या सगळ्यांवर एकच गोष्ट मात करू शकते – संघर्षात टिकून राहण्याची जिद्द.

संघर्ष म्हणजे अपयश नव्हे – तो तर यशाकडे जाणारा मार्ग आहे.
प्रत्येक यशस्वी व्यक्तीचा एक संघर्षाचा काळ असतो –
अंधारात दिवा लावल्याशिवाय प्रकाश मिळत नाही,
तापल्याशिवाय सोनं शुद्ध होत नाही,
तसंच – संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही.

मीही त्या काळात विचार केला होता —
"माझं काय होईल?"
"मी यशस्वी होईल का?"
पण एक गोष्ट ठरवली होती – हार मानायची नाही.

दररोज थोडं थोडं पुढे जात राहिलो.
दर अपयशातून शिकत राहिलो.
मनाला तयार केलं – "तू एक दिवस अधिकारी होणारच."
आणि हे फक्त मी नाही केलं – ते कोणतीही स्वप्न बघणारी, ती पूर्ण करण्यासाठी झगडणारी प्रत्येक व्यक्ती करते.

म्हणून माझा सल्ला आहे:
मन लागत नाही? – मग स्वतःला विचार, का लागत नाही? आणि त्याचं उत्तर शोध.

कसा अभ्यास करावा माहिती नाही? – मग शिका, मार्गदर्शन घ्या. सुरुवात कुठून तरी करावी लागते.

अभ्यास होत नाही? – मग रोज थोडा वेळ ठरव, आणि त्या वेळात फक्त स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न कर.

यश हे एक दिवसात मिळत नाही,
पण प्रत्येक दिवसाच्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी, यश एक दिवस आपलंच होतं.

आज मी अधिकारी आहे, पण त्याआधी मीही अश्रू गाळले आहेत, रात्रभर जागून अभ्यास केला आहे, अपयश पचवलं आहे.
तुम्हीही करू शकता – तुमच्या संघर्षात शक्ती आहे, आणि त्या संघर्षावर तुमचं यश उभं आहे.

संघर्ष करत रहा, झगडत रहा – कारण स्वप्न उंच आहे, आणि तुम्ही त्यासाठी बनलेले आहात.

– तुमचा मित्र संघर्ष करणारा सवंगडी
✍️ सुशांत कुलकर्णी
(कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई)
@sushant_kulkarni_official
Insta ID @Dr.Sushant_4848
✍️💪📚
5
2025/07/12 08:58:55
Back to Top
HTML Embed Code: