Telegram Web
#polity
अनेक स्ञोतांपासून तयार केलेले संविधान

✔️भारतीय संविधान तयार करताना विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास करण्यात आला. इतर देशांच्या संविधानातील चांगल्या तरतूदी
भारतीय संविधानात समाविष्ठ करण्यात आल्या. माञ असे करताना त्या तरतूदींमध्ये भारतीय परिस्थितीशी सुसंगत असे बदल करण्यात आले.

✔️भारत सरकार कायदा १९३५– संघराज्य व्यवस्था, गव्हर्नर, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीविषयक तरतूदी.
✔️ब्रिटीश संविधान– संसदीय शासनपद्धती, कायद्याचे राज्य, कायदेनिर्मितीची प्रक्रिया, एकेरी नागरिकत्व, कॅबिनेट व्यवस्था, संसदीय विशेषाधिकार, द्विगृही कायदेमंडळ.
✔️अमेरिकन संविधान– मुलभूत हक्क, न्यायमंडळाचे स्वातंञ्य, न्यायालयीन पुर्नविलोकन, राष्ट्रपतींवरील महाभियोग प्रक्रिया, उपराष्ट्रपती पद, सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना काढून टाकण्याची पद्धत.
✔️आर्यलॅंडचे संविधान– शासनाच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतींच्या निवडणूकीची पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांची नामनिर्देशनाने नियुक्ती.
✔️कॅनडाचे संविधान– केंद्र प्रबळ असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे सोपविण्याची तरतूद, केंद्राकडून गव्हर्नरांची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकारक्षेञ.
✔️ऑस्ट्रेलियन संविधान– समवर्ती सूची, व्यापार व वाणिज्य स्वातंञ्य, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक.
✔️जर्मनीचे वायमर संविधान– आणीबाणीच्या काळात मुलभूत हक्क स्थगित होण्याची तरतूद.
✔️सोव्हियत संविधान– मुलभूत कर्तव्ये, प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे तत्व.
✔️दक्षिण आफ्रिकेचे संविधान– घटनादुरुस्तीची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक.
✔️फ्रांसचे संविधान– गणराज्य, प्रास्ताविकेतील स्वातंञ्य, समता व बंधुता ही तत्वे.
✔️जपानचे संविधान- कायद्याने प्रस्थापित केलेली पद्धत हे तत्व.
#current
शाश्वत विकास अहवाल (Sustainable Development Report)' २०२१

✔️नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ‘शाश्वत विकास अहवाल (Sustainable Development Report - SDR) २०२१’ च्या ६ व्या आवृत्तीत भारत १६५ देशांच्या यादीत १२० व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

✔️सदर क्रमवारीत भारत ६०.१ गुणांसह या स्थानावर विराजमान आहे.

अव्वल देश क्रमवारी

१. फिनलँड
२. स्वीडन
३. डेन्मार्क
Forwarded from 📚MPSC STI PSI ASO📚
🎭🎭पश्चिम बंगालमध्ये विधानपरिषद निर्माण करण्यास मंजुरी..🎭🎭

🎯पश्चिम बंगालच्या विधानसभेत संविधानातील कलम 169 अन्वये राज्यात विधानपरिषद निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

बंगाल विधानपरिषदेची रचना...

🎯बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. विधानपरिषदेची स्थापना झाल्यावर विधानपरिषदेत एकूण 98 सदस्य असतील. भारतीय संविधानानुसार विधानसभेच्या जागेच्या एक तृतियांश जागांपेक्षा विधानपरिषदेच्या जागा अधिक असता कामा नये.

🎯राज्यातील विधानसभेने विशेष बहुमताने विधानपरिषदेच्या संदर्भात कोणताही ठराव संमत केल्यास भारतीय संविधानातील कलम 169 अन्वये संसद कायद्याने राज्यातील द्वितीय सभागृह बनवू किंवा रद्द करू शकते.

इतिहास...

🎯पश्चिम बंगालमध्ये पाच दशकांपूर्वी विधानपरिषदेची व्यवस्था होती. नंतर विधानपरिषद विसर्जित करण्यात आली. 21 मार्च 1969 रोजी 51 सदस्य असलेली विधानपरिषद विसर्जित करण्यात आली होती.

🎯वर्तमानात उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगना, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहेत.

विधानसभा आणि विधानपरिषद...

🎯भारत सरकारच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या घटकराज्याच्या प्रमुखपदी राज्यपाल असतात. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार ती नेमणूक रद्द होऊ शकते. राज्यपाल हे जरी राज्याचा घटनात्मक प्रमुख असले, तरी ते केंद्रीय सरकारचे प्रतिनिधित्व करतात. राज्यात संविधानाप्रमाणे राज्य चालते किंवा नाही हे ते पाहतात आणि तसे नसल्यास राष्ट्रपतींकडे अहवाल सादर करतात.
Forwarded from Mpsc Career
विम्बल्डन ओपन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा २०२१
संस्करण : १३४वे (१८७७ पासून सुरुवात)

👩‍🦰 पुरुष एकेरी :
एन जोकोविच (सर्बिया)
📌 पराभूत केले : मॅटिओ बेरेटिनी (इटली)

🏆 जोकोविचचे हे सहावे विम्बल्डन विजेतेपद
📌 २०११,१४,१५,१८,१९ मध्ये विजेतेपद

🏆 *जोकोविचचे हे २०वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद* ,
📌 २० ग्रॅण्डस्लॅम विजेते :
नदाल व फेडरर

📌 सर्वात जुनी टेनिस स्पर्धा म्हणून ओळख
🚫 २०२० मध्ये स्पर्धेचे आयोजन झाले नाही
Forwarded from Mpsc Career
🛑अरुणा असफ अली : 
( १६ जुलै १९०९ — २९ जुलै १९९६)

🔸 भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी महिला, छोडो भारत आंदोलनातील वीरांगना आणि भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी. अरुणा उपेंद्रनाथ गांगुली हे त्यांचे पूर्वीचे नाव.

🔸वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी आपल्यापेक्षा वयाने २३ वर्षे मोठे असलेल्या सुप्रसिद्ध मुस्लिम वकील असफ अली यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केला (१९२८). या विवाहास त्यांच्या कुटुंबियाचा विरोध होता.

🔸१९३० व १९३२ च्या कायदेभंग चळवळीत तसेच १९४१ मध्ये वैयक्तिक सत्याग्रहात त्या सहभागी झाल्या, त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला

🔸1942 च्या भूमिगत क्रांतिकारकांचे नेतृत्व - दैनिक Tribunal ने केले.
👉"1942 ची झाशीची राणी" म्हणून गौरव केला.

🔸१९४७ मध्ये दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. सन १९४८ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला; पण लगेचच दोन वर्षांनी समाजवादी पक्ष सोडून त्यांनी सहकाऱ्याच्या मदतीने डावा समाजवादी पक्ष निर्माण केला (१९५०). पुढे हा पक्ष कम्युनिस्ट पार्टीमध्ये सामील झाला (१९५५)
या पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सदस्य आणि अखिल भारतीय कामगार संघटनेच्या उपाध्यक्ष झाल्या. १९५८ मध्ये त्यांनी कम्युनिस्ट पक्ष सोडला व सक्रिय राजकारणापासून काही काळ अलिप्त राहिल्या.

🔸राममनोहर लोहिया यांच्यासोबत काँग्रेसच्या इन्किलाब या नियतकालिकाचे संपादन अरुणाजी करीत असत.

🔸अरुणा दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या (१९५८)

🔸लिंक हे साप्ताहिक त्यांनी सुरू केले

🔸अमेरिकेत भारताच्या राजदूत म्हणूनही त्यांनी कार्य केले.

🔸इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटी’, ‘
ऑल इंडिया पीस कौन्सिल’,
‘नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमेन’ इत्यादी सामाजिक संस्थांशी त्या संबंधित होत्या

🔸त्यांच्या 'ट्रॅव्हल टॉक' या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत पंडित नेहरू त्यांचे वर्णन करताना म्हणतात, ‘अरुणा हे एक अस्वस्थ आणि दुसऱ्यांना अस्वस्थ करणारे व्यक्तिमत्त्व आहे.’

🔸सन्मान/पुरस्कार
🔳सोव्हिएत लँड नेहरू पारितोषिक (१९५५)

🔳 लेनिन शांतता पुरस्कार (१९७५)

🔳आंतरराष्ट्रीय सामंजस्याचा ‘जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ (१९९१)

🔳भारत सरकारने १९९२ मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’

🔳तसेच सर्वोच्च असा ‘भारतरत्न’ पुरस्कार मरणोत्तर देऊन त्यांचा गौरव केला (१९९७).

🔳भारतीय टपाल खात्याने त्यांच्या छायाचित्राचे टपाल तिकीट काढून त्यांच्या कार्याचा सन्मान केला (१९९८).

⚡️संदर्भ - मराठी विश्वकोश
Forwarded from 📚MPSC STI PSI ASO📚
भारतातील पहिल्या 100 श्रीमंतात एक शिक्षक सुध्दा !!

फोर्ब्स ने भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची नुकतीच एक यादी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये एकेकाळी ट्युश घेणाऱ्या एका शिक्षकाचाही समावेश केला आहे. 'फोर्ब्स' च्या म्हणण्यानुसार त्याची सध्याची संपत्ती १.८ अब्ज डॉलर्स इतकी आहे. एका शिक्षकाकडे असलेली इतकी रक्कम वाचून कदाचित आपणांस आश्चर्य वाटत असेल. पण, इतकी संपत्ती मिळविण्यामागे संघर्षही मोठाच आहे. कोण हा शिक्षक ? काय आहे त्याचा संघर्ष ? केरळ मधील कन्नूर जिल्ह्यातील अझिकोड या ठिकाणी एका शिक्षक दांपत्याच्या पोटी १९८० सालच्या दरम्यान त्याचा जन्म झाला. घरच्या शैक्षणिक वातावरणामुळे त्याच्यावर उत्तम संस्कार झाले. त्यामुळेच त्याने मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करू लागला. सुट्टीच्या निमित्ताने काही दिवस तो बेंगलोर ला गेला. तेथे त्याचे काही मित्र CAT परीक्षेची तयारी करत होते. त्या मित्रांना त्याने गणित विषयासाठी मार्गदर्शन केले. त्याचे ते सर्वच मित्र त्या परीक्षेत यशस्वी झाले. त्या मित्रांनी त्याला ट्युशन सुरू करण्याविषयी आग्रह धरला. मित्रांच्या आग्रहाचा सकारात्मक विचार केला. नोकरी सोडली आणि आपले संपूर्ण लक्ष ट्युशन देण्यावर केंद्रित केले. त्याच्या शिकविण्याच्या पद्धतीने अल्पावधीतच तो लोकप्रिय झाला. त्याचा क्लास छोट्याशा खोलीतून हॉलमध्ये गेला. हॉल मधून ऑडीटोरियममध्ये आणि तेथून थेट स्टेडियममध्ये गेला. एकाच वेळी तब्बल २५००० विद्यार्थ्यांची त्याने ट्युशन घेतली. इतका तो प्रचंड प्रसिद्ध झाला. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या शहरात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याने पैसा, वेळ आणि श्रम तिन्हींचा अपव्यय होऊ लागला. एकाच वेळी, एकाच ठिकाणाहून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल. असे साधन निर्माण करण्याचा विचार त्याच्या मनात डोकावू लागला आणि त्याला एक कल्पना सुचली. त्याने एक ऑनलाईन शिकवणी घेणारी 'Think and Learn Private Ltd.' ही कंपनी सुरू केली. त्याच्या माध्यमातून एक वेबसाईट सुरू केली. त्यावर अनेक व्हिडिओ अपलोड केले. अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होऊ लागला. ती साईट ही लोकप्रिय झाली. मग त्याने एक ऍप तयार केले. या ऍपच्या माध्यमातून ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत सर्व विषयांचे शिक्षण, अगदी घरबसल्या मिळू लागले. अल्पावधीतच या ऍपने पालकांचे, विद्यार्थ्यांचे लक्ष आकर्षित केलेच शिवाय अनेक गुंतवणूक दारांचे ही लक्ष आकर्षित केले. आणि त्याला यशाच्या शिखरावर पोहचविले. ते ऍप म्हणजेच BY JU's आणि त्याचा संस्थापक बायजू रविंद्रन होय. BYJU's ही भारतातील नव्हे तर जगातील सर्वोत्तम एडटेक कंपनी आहे. एका खोलीत सुरू झालेल्या ट्युशन चा पसारा साऱ्या जगभर पसरला आहे. यासाठी बायजू रविंद्रनचे कष्ट, कामावरील श्रद्धा आणि स्वतःवरील विश्वास या गोष्टी कारणीभूत आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील सर्वोत्तम गुणाची जाण असणे फार गरजेचे आहे. एखादी गोष्ट अतिशय सोपी करून सांगणे हा सर्वोत्तम गुण बायजू यांच्याकडे होता. त्याचा त्यांना शोध लागला. त्यामुळेच ते यशाच्या शिखरावर पोहोचू शकले. आज भारतातील सर्वाधिक १०० श्रीमंतांच्या यादीत "बायजू रविंद्रन" यांचा समावेश आहे. - अग्रेषित.

━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा @maaymarathiworld 📰━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ

🔰सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट

🔰हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा

🔰हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर

🔰पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड

🔰‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर

🔰भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद)

🔰चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध – हुपरी (कोल्हापुर)

🔰औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर

🔰औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा

🔰वाशिम शहराचे जुने नांव होते – वत्सगुल्म

🔰महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा

🔰घारापूरी “एलेफंटा केव्हज” कोठे आहे – उरण (रायगड)

🔰ब्रम्हदेशाचा थीबा राजाचा राजवाडा – रत्नागीरी

🔰पुणे शेअर बाजाराची स्थापना – १९८२

━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा @maaymarathiworld ❤️━━━━━━━━━━━━━━━━━━
भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी


1. नदी = उगम = लांबी = उपनदया = कोठे मिळते

2. गंगा = गंगोत्री = 2510 = यमुना, गोमती, शोण = बंगालच्या उपसागरास

3. यमुना = यमुनोत्री = 1435 = चंबळ, सिंध, केण, बेटवा = गंगा नदिस अलाहाबाद जवळ

4. गोमती = पिलिभीत जवळ = 800 = साई = गंगा नदिस

5. घाघ्रा = गंगोत्रीच्या पूर्वेस = 912 = शारदा, राप्ती = गंगा नदिस

6. गंडक = मध्य हिमालय (नेपाळ) = 675 = त्रिशूला = गंगा नदिस पटण्याजवळ

7. दामोदर = तोरी (छोटा नागपूर पठार) = 541 = गोमिया, कोनार, बाराकर = हुगळी नदिस

8. ब्रम्हपुत्रा = मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = मानस, चंपावती, दिबांग = गंगा नदिस बांग्लादेशामध्ये

9. सिंधु = मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास = अरबीसमुद्रास

10. झेलम = वैरीनाग = 725 = पुंछ, किशनगंगा = सिंधु नदिस

11. रावी = कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश) = 725 = दीग = सिंधु नदिस

12. सतलज = राकस सरोवर = 1360 = बियास = सिंधु नदिस

13. नर्मदा = अमरकंटक (एम.पी) = 1310 = तवा = अरबी समुद्रास

14. तापी = मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश) = 702 = पूर्णा, गिरणा, पांझरा = अरबी समुद्रास

15. साबरमती = अरवली पर्वत = 415 = हायमती, माझम, मेखो = अरबी समुद्रास

16. चंबळ = मध्य प्रदेशामध्ये = 1040 = क्षिप्रा, पार्वती = यमुना नदिस

17. महानदी = सिहाव (छत्तीसगड) = 858 = सेवनाथ, ओंग, तेल = बंगालच्या उपसागरास

18. गोदावरी = त्र्यंबकेश्वर = 1498 = सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती = प्रदेशात राजमहेद्रीजवळ

19. कृष्णा = महाबळेश्वर = 1280 = कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा = बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात

20. भीमा = भीमाशंकर = 867 = इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान = कृष्णा नदिस.

21. कावेरी = ब्रम्हगिरी (कर्नाटक) = 760 = भवानी, सुवर्णवती, कर्नावती = बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)

22. तुंगभ्रद्रा = गंगामूळ (कर्नाटक) = 640 = वेदावती, हरिद्रा, वरद = कृष्णा नदिस

━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा @maaymarathiworld ❤️━━━━━━━━━━━━━━━━━━
Forwarded from 𝗣𝗞 𝗦𝗧𝗔𝗧𝗨𝗦 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗜𝗔𝗟 (➻❥P♕ Kʀιsнᴀɴ★᭄ꦿ᭄ꦿ)
*दिपावलीच्या आपल्या सर्व परिवारास माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा🪔🏮🕯️*

*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास*
*आंनदाची आणि भरभराटिची जाओ..ही ईश्वरचरणी प्रार्थना*

🪴🏵️|| शुभ दिपावली ||🕯🪴
Forwarded from @SID १००
🟠निधन व्यक्तीमत्वे : जनरल बिपीन रावत🟠
Join group
https://www.tgoop.com/joinchat-PVjcfsobKCEwMjg1

🔸नाव : बिपीन लक्ष्मणसिंग रावत

🔹जन्म : 16 मार्च 1958, पौडी , उत्तर प्रदेश 

🔸मृत्यू : ८ डिसेंबर २०२१ (वय ६३) कुन्नूर , तामिळनाडू 

🔹मृत्यूचे कारण : हेलिकॉप्टर अपघात

🔸जोडीदार : मधुलिका रावत

🔹गुरुकुल
-राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( बीएससी )
-यूएस आर्मी कमांड अँड जनरल स्टाफ कॉलेज 
-मद्रास विद्यापीठ
-चौधरी चरण सिंग विद्यापीठ ( पीएचडी ) 

🔸शाखा/सेवा : भारतीय सैन्य सेवा (6 डिसेंबर 1978 - 8 डिसेंबर 2021)

🔹युनिट : 5/11 गोरखा रायफल्स

🔸सेवा क्रमांक : IC-35471M 

🔹पहिले भारतीय सशस्त्र दलाचे  प्रमुख संरक्षण कर्मचारी (CDS)
(1 जानेवारी 2020 - 8 डिसेंबर 2021)

🔸चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे 57 वे अध्यक्ष
(27 सप्टेंबर 2019 - 31 डिसेंबर 2019)

🔹26 वे लष्करप्रमुख.
(31 डिसेंबर 2016 - 31 डिसेंबर 2019)

🔸लष्कराचे 37 वे उपप्रमुख
(1 सप्टेंबर 2016 - 31 डिसेंबर 2016)

🔹पुरस्कार
-परम विशिष्ट सेवा पदक
-अति विशिष्ट सेवा पदक
-युद्ध सेवा पदक
-सेना पदक
-विशिष्ट सेवा पदक

Join group
https://www.tgoop.com/joinchat-PVjcfsobKCEwMjg1
Forwarded from @SID १००
🔸भौगोलिक उपनाव - 🔸टोपणनाव
Join group
https://www.tgoop.com/joinchat-PVjcfsobKCEwMjg1

1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)

2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान

3) काळे खंड - आफ्रिका

4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया

5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क

6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी

7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा

8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार

9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड

10) नाईलची देणगी - इजिप्त

11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन

12) पाचुचे बेट - श्रीलंका

13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान

14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर

15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे

16) गव्हाचे कोठार - युक्रेन

Join group
https://www.tgoop.com/joinchat-PVjcfsobKCEwMjg1
🗓️ बुधवार, १५ जून

Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔥️ 👑Mayur Status King 👑🔥

🔥️ MPSC♨️राजमुद्रा♨️📚🎯🚨

🔥️ Police Bharti 2022 || पोलीस भरती 2022

🔥️ 💥स्पर्धा परीक्षा प्रेरणादायी विचार💥

🔥️ Success mpsc

🔥️ JangJohar-जंगजोहर

🔥️ golden.history.of.maharashtra

🔥️ Maharashtra Times

═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट

Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Maharashtra Times 👇
2025/02/19 07:57:31
Back to Top
HTML Embed Code: