tgoop.com/BacchuKaduOfficial/1004
Last Update:
भारताचा स्वातंत्र्यलढ्यात जीवाची बाजी लावलेल्या अज्ञात क्रांतीवीरामध्ये अग्रणी नाव येतं भागोजी नाईक यांचं. १८०४ साली नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे इथे एका भिल्ल कुटुंबात जन्मलेल्या भागोजी नाईक यांचे वडील कोतवाल होते मात्र घरात अठराविश्वे दारिद्र्य होतं. शिक्षण घेण्याची ऐपत नव्हतीच. वासराचा जीव वाचवण्यासाठी फक्त कुऱ्हाडीच्या जोरावर वाघ मारणाऱ्या या तरुणाला इंग्रज कंपनी सरकारने पोलिसात नोकरी दिली. पुढे ते अधिकारी देखील झाले. पण आपल्याच लोकांवर कारवाया करणे त्यांना पटले नाही. इंग्रज अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांना एक वर्ष तुरुंगात देखील राहावे लागले. पण ते तुरुंगातून बाहेर पडले स्वातंत्र्याची शपथ घेऊनच. भागोजींनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले आणि अनेक लढाया जिंकल्या. अखेर इंग्रजांनी फितुरी करुन सांगवी इथल्या देवनदी व गोदावरीच्या संगमावर भागोजींचा ठाव घेतला. ११ नोव्हेंबर १८५९ ची काळरात्र ठरली आणि त्यांना वीरमरण आले.
BY Bacchu Kadu
Share with your friend now:
tgoop.com/BacchuKaduOfficial/1004