tgoop.com/MRATHI123/7105
Last Update:
*!! शिक्षक आम्ही भाग्यवान !!*
(गुलाब सोनोने)
कुणाला मिळतो सांगा ?
इतका मान आणिक सन्मान...
जन्मोजन्मीची पुण्याई आमची,
शिक्षक आम्ही भाग्यवान...
आत्मविश्वासाच्या शिदोरीने
घेतात उत्तुंग गगन भरारी..
सजीव तारांगणे विद्यालयी
चकाकतात तेजोमय करारी...
हेच आमचा जीवप्राण
यांच्या ठाई युक्ती, शक्ती महान...!
जन्मोजन्मीची पुण्याई आमची,
शिक्षक आम्ही भाग्यवान...!
समर्थपणे नेतात साता समुद्रापार
सत्यसंस्कार आरसा...
यशोधनाची ही गुरुकिल्ली
संयमी कुटुंबाचा वारसा...
चिमण्या पाखरांचे सुयश
चिंतित येते रात्र अन् दिनमान...!
जन्मोजन्मीची पुण्याई आमची,
शिक्षक आम्ही भाग्यवान...!
अक्षय समाधान विद्यामंदिरी,
समर्थ गुरु शिष्य परंपरा...
राग, द्वेष, क्लेश, नुरे
मिळे ज्ञान,योग,गीत, अंतरा...
ऋणानुबंध लेवून आठवणींचे पक्षी
पुन्हा परतून येतात गुणवान...!
जन्मोजन्मीची पुण्याई आमची,
शिक्षक आम्ही भाग्यवान...!
✍️.. गुलाब रा. सोनोने
Mr. Rose
यवतमाळ
7744971615
( 5 सप्टेंबर 2024 शिक्षक दिनाच्या सर्व बंधू भगिनींना मंगल शुभेच्छा 💐🙏)
BY मी मराठी कविता समुह.....
Share with your friend now:
tgoop.com/MRATHI123/7105