tgoop.com/MRATHI123/7106
Last Update:
दि.५ सप्टेंबर २०२४ गुरूवार
शीर्षक- *ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते*
काव्यप्रकार- *मुक्तछंद*
चोरी न होणारी असे एकच संपत्ती
तिला ज्ञानसंपत्ती म्हणतात
दिल्याने वाढणारी असते ती
म्हणूनच ज्ञानदान सर्वश्रेष्ठ मानतात
ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते
ज्ञानाला साचून ठेवू नये कधी
साचून ठेवल्याने बुद्धीला गंज चढतो
मुक्तहस्ताने वाटल्याने बुद्धीवर
साचलेलं कार्बन दूर जात असतो.
विद्यादान सर्वांनाच करावं
ज्ञानाचा विधायक उपयोग करावा
विघातक रूप नको त्याला
जनकल्याणाचाच ध्यास मनी धरावा
डायनामाईटशोधक अल्फ्रेड नोबेल
अणूउर्जेचा शोध अल्बर्ट आईन्स्टाईनने लावला
ज्ञानाच्या अशा संहारक रूपाने
जगातील मानवजातीचा सर्वनाशच केला.
ज्ञानार्थी बनू नको बनणे पोटार्थी
करू साधना फक्त ज्ञानाची
प्राप्त ज्ञानाचा उपयोजन करणाराच
खरा ज्ञानवंत उपाशी मरतच नाही
हीच खूणगाठ बांधा चित्ती
फक्त शिक्षित होणं नसे पुरेसे
सुशिक्षित, सुसंस्कारी होणं आवश्यक आहे
प्रत्येक नारीत आई,बहीण शोधण्याची
दृष्टी सुसंस्कारानेच वाढत राहे.
*✍️शीघ्रकवी श्री पद्माकर दत्तात्रेय वाघरूळकर, (दत्तिंदुसुत/पद्मदा) भाषाशिक्षक, छत्रपती संभाजीनगर📱९७३०७९८२७९🤝*
BY मी मराठी कविता समुह.....
Share with your friend now:
tgoop.com/MRATHI123/7106