tgoop.com/MRATHI123/7121
Create:
Last Update:
Last Update:
*चहा*
विचार येतो मनात
चहात असं काय?
लोक म्हणतात झोप उडते
खरंच असतं अस यामध्ये काय?.....1
चहाचे प्रकार किती
वेगवेगळ्या नावांनी चहाची ख्याती
कौतुक चहाचे करता किती
एक घुट पिला तरी मिळते शांती.....2
संध्याकाळ झाली की पुकारा होतो
हळूच चहा सोबत भजे मागवतो
म्हणतात चहा घेताच उत्साह वाढतो
समजत नाही चहा म्हणजे काय प्रकार असतो?.....3
मी आहे योगा मास्टर
देईल नाही कोणाला चहाची ऑफर
मी म्हणते गोड नको कडूच प्या
वाटलंच तर चहा ऐवजी दूधच प्या.....4
मी म्हणते चहा नको
कडू काढा प्या
रोगाला आमंत्रण कशाला देता
चहा सोडा रोगमुक्त व्हा.....5
*सौ.वैजयंती विकास गहूकर*
*योगा टीचर*
*जिल्हा. चंद्रपूर*
[email protected]
BY मी मराठी कविता समुह.....
Share with your friend now:
tgoop.com/MRATHI123/7121