tgoop.com/MRATHI123/7123
Last Update:
*रिटायर वडील...!!!*
😢
*आज जेवून झाल्यावर*
*वडील बोलले...*
" *मी आता रिटायर्ड होतोय.*
*मला आता नवीन कपडे*
*नको. जे असेल, ते मी*
*जेवीन. रोज वाचायला*
*पेपर नको. आजपासून*
*बदामाचा शिरा नको, मोटर गाडीवर फिरण बंद,बंगला नको,बेड नको,एका कोपर-यात थोडी जागा झोपण्यास मिळाली तरी खुप झाल,आणि हो तुमचे सुनबाईचे मिञ व मैञिनी चार पाहुणे आलेतर मला आगोदर सांगा मी बाहेर जाईल पण त्यांच्या समोर बाबा तुम्ही बाहेर बसा😡 आस सांगु नका तुम्ही मला*
*जसं ठेवाल, तसं राहीन."*😢😢😢
कांहीतरी कांपताना सुरीनं
बोट कापलं जावं आणि
*टचकन पाणी डोळ्यात* यावं,
काळीजच तुटावं, अगदी तसं
झालं...
एवढंच कळलं, की आजवर
जे जपलं, ते सारंच फसलं...
कां *वडीलांना* वाटलं, ते
ओझं होतील माझ्यावर...?🤔
मला त्रास होईल, जर ते गेले
नाहीत कांमावर...?
ते घरात राहिले, म्हणून
कोणी *ऐतखाऊ* म्हणेल...
की त्यांची घरातली किंमत
*शून्य* बनेल...???
आज का त्यांनी
दम दिला नाही...?
"काय हवं ते करा, माझी
तब्बेत बरी नाही, मला
कामावर जायला जमणार
नाही..."
खरंतर हा अधिकार आहे,
त्यांचा सांगण्याचा. पण ते
काकुळतीला कां आले...?
ह्या विचारातच माझं मनं
खचलं. नंतर माझं उत्तर
मला मिळालं...
जसजसा मी मोठा होत
गेलो, *वडीलांच्या* कवेत
मावेनासा झालो.
तेव्हा नुसतं माझं शरीरच
वाढत नव्हतं, तर त्याबरोबर
वाढत होता तो माझा *अहंकार*
आणि त्यानं वाढत होता,
तो विसंवाद...
आई जवळची वाटत होती.
पण, *वडीलांशी* दुरावा
साठत होता...
*मनांच्या खोल तळापर्यंत*
*प्रेमच प्रेम होतं.* पण, ते
कधी *शब्दांत* सांगताच
आलं नाही...
*वडीलांनीही* ते दाखवलं
असेल. पण, दिसण्यांत आलं
नाही.
मला लहानाचा मोठा करणारे
*वडील,* स्वःताच स्वतःला
लहान समजत होते...
मला ओरडणारे - शिकवणारे
*वडील,* कां कुणास ठाऊक 🤔
बोलतांना धजत होते...
*मनानं कष्ट करायला तयार*
*असलेल्या वडीलांना,*
शरीर साथ देत नव्हतं...
*शून्यातून सारं उभं केलेल्या*
*तपस्वीला,* घरांत नुसतं,
बसू देत नव्हतं...
*हे मी नेमकं ओळखलं...!!*
खरंतर मी कामावर जायला
लागल्यापासून, सांगायचंच
होतं त्यांना, की *थकलाहांत*,तुम्ही
आराम करा. पण,
आपला अधिकार नव्हे,
सूर्याला सांगायचा, की
*“मावळ आता”...!!*
लहानपणीचे हट्ट पुरवणारे
*वडील...*
मधल्या वयांत अभ्यासासाठी
ओरडणारे *वडील...*
आणि नंतर चांगलं वागण्यासाठी
कानउघडणी करणारे *वडील...*
आजवर सारं कांही देऊन
कसलीच अपेक्षा न ठेवता,
जेव्हा खुर्चीत शांत बसतात,
तेव्हा वाटतं, की कांही जणू
*आभाळंच खाली झुकलंय !!*
कधीतरी या *आभाळाला*
*जवळ बोलवून* खूप कांही
*बोलावसं वाटतं...!!*
पण तेव्हा लक्षांत येतं, की
*आभाळ कधीच झुकत*
*नाही, ते झुकल्यासारखं*
*वाटतं...!!*
आज माझंच मला कळून
चुकलं, की *आभाळाची*
*छत्रछाया ही खूप कांही*
*देऊन जाते...!!!*
*सर्व रिटायर्ड आणि जेष्ठ*
*नागरीकांसाठी समर्पित...!!!*🪷🙏🏻🪷🙏🏻🪷
BY मी मराठी कविता समुह.....
Share with your friend now:
tgoop.com/MRATHI123/7123