tgoop.com/MRATHI123/7129
Create:
Last Update:
Last Update:
सखे तू येते नी का जाते
तू सामोरी उभी राहता
शब्द ना उमटती ओठे
वारा थांबे तुज पाहता
धाक हा की विरह पाते ?....१
सखे, तू येते नी का जाते ?//ध्रु //
मनीच्या मनी राही व्यथा
आशा जळे ,हृदयी पिळे
पुढे ना सरे प्रेम कथा
दिसा मागे रात्र का पळते ?.......२
जाणते तरी ही फिरते
पुन्हा पुन्हा हात सोडते
गर्तेत रात थरथरते
पापणी का पाणी झरते ?......३
तू पुढे पुढे वाट चाले
धूळ उडे ,नयनी चरते
शब्द मुके, पाय पांगळे
तू मला अशी का छळते ? ....४
दुष्ट इच्छा, लागावी ठेच
मागे वळूनी तु पहावे
उरात असे धस्स व्हावे
नयनी का आशा उरते ?.....५
काय ही तुझी मजबुरी
जरा नाही तुज सबुरी
काहणी अशीच अधुरी
तुला कळे ना मला कळते ?...६
सखे,तू येते नी का जाते ? //ध्रु //
नामदेव हुले पुणे
9371175901
BY मी मराठी कविता समुह.....
Share with your friend now:
tgoop.com/MRATHI123/7129