tgoop.com/estudyi/7453
Last Update:
असुरक्षित सोसिअल मीडिया..
✍️" अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यानी अभ्यास सोडून फेसबुक इन्स्टाग्रामवर टाइमपास करत बसू नये. तिथे चांगल्या लोकापेक्षा वाईट लोकं जास्त भेटतात.फेसबुक, इन्स्टाग्राम ही माध्यम अजूनही मुलींसाठी सुरक्षित नाही. ज्यांच्याकडे वेळ आहे त्याने ते खुशाल वापरावे.पण अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ते वापरू नये. UPSC च्या परीक्षेत 2016मध्ये 1ली आलेल्या IAS टीना डाबीच IAS बनेपर्यंत फेसबुक इन्स्टावर अकाउंट नव्हतं. IAS शुभम कुमार सुद्धा 2021मध्ये देशातून 1ले आले. त्यांचसुद्धा फेसबुकला अकाउंट नव्हतं. ज्यांना जीवनात यशस्वी व्हायच आहे,मोठ्या पदावर जायच आहे, त्यांनी आपला अमूल्य वेळ फेसबुक इन्स्टावर गमवू नये.मी सुद्धा फेसबुक इन्स्टाग्राम वापरत नाही.. कारण वेळ वाया जातो.नको त्या गोष्टीत वेळ गमवण्यात अर्थ नाही. ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी ते वापराव. पण ज्यांना यशस्वी व्हायच आहे. त्यांनी या नकारात्मक सोसिअल मीडियापासून सुरक्षित अंतर ठेवावं.व्हाट्सअप टेलिग्राम ही माध्यमं संपर्कासाठी आणि अभ्यासासाठी चांगली आहे.. पण त्याचाही वापर लिमिटमध्येच हवा."✍️
BY संपूर्ण नोबल मेगा सामान्य ज्ञान चॅनल सर्व स्पर्धा परिक्षा उपयुक्त

Share with your friend now:
tgoop.com/estudyi/7453