tgoop.com/shabdamanache/7614
Last Update:
जगण मातृभूमीसाठी...!🇮🇳❤️🤗
नुकताच घरी येऊन बसलेला त्याला त्याच्या लहान बहिणीने आज एक कुतूहलाचाच प्रश्न केला होता की "दादा तू जगतो कशासाठी"? चिमुकल्या आरुचा प्रश्न एकूण तो जरा वेळ तिच्याकडे पाहतच राहिला नंतर म्हणला "असा का प्रश्न आज"? अरे हे बघ माझ्या पुस्तकात प्रश्न दिलाय तुम्ही का जगता?🤔 तुमची ध्येय काय? 🤔तुमची स्वप्न काय?🤔 तो तिच्याकडे पाहत म्हणाला "ये इथं बस" आयुष्यात प्रत्येक व्यक्तीच काहीतरी ध्येय असत कोणाकोणाच नसेलही कदाचित पण काहीतर कारण असत ज्यामुळे व्यक्ती जगत असतो तस माझं एक स्वप्न आहे "माझं जगण एकाच कारणासाठी आहे ते म्हणजे आपल्या मातृभूमीसाठी" आपल्या काळ्या आईसाठी प्राण पणाला लावून देण "मग ते तू कस करशील"? मधेच त्याच बोलणं थांबवत आरु म्हणाली " मातृभूमीसाठी जगायचं म्हणजे देशसेवा करायची त्यासाठी मला वर्दी अंगावर चढवायची आहे" विना वर्दीचीही देशसेवा होते पण जे बळ त्या खाकीत आहे, जी लढण्याची, झुंजण्याची आणी आपल्या मातीसाठी,आपल्या तिरिंग्यासाठी वेळ पडलीच तर जीव देण्याची ताकत एका वर्दीतल्या कट्टर देशभक्ताकडेच असते😇💪 अगं वाघाचं काळीज लागत देशापांयी जीव अर्पण करायला माझ्यासाठी माझं सर्वस्व माझा देश आहे माझं स्वप्न आहे की मेलो तरी देशासाठीच मरावं...❤️
अगं ऊन असो वारा असो की पाऊस असो जो आपल्या जीवाची पर्वा न करता तटस्थ पाहडासारख उभा राहून प्रत्येक परिस्तिथीला मोठ्या ध्येऱ्याने सामोरे जातो तो असतो वीर जवान जेव्हा आपण सगळे शांततेत झोपलेलो असतो तेव्हा तो सीमेवर लढत असतो आपल्या देशावर येणाऱ्या प्रत्येक संकटाशी... 🥺😇 एवढ्या थंडीतही तो त्याच कर्तव्य पूर्ण एकनिष्ठतेने बजावतो म्हणुनच तर आपण इकडं शांत झोपू शकतो...😌 जो आपल्या देशासाठी जीवाची बाजी लावून दुष्मणांशी लढतो तोच म्हणावा ह्या देशाचा खरा वीर आणी मातृभू चा पुत्र...💪😎🇮🇳 जो आपल्या देशप्रेमासाठी संसार,घरदार, आपल्यांचा त्याग करून सीमेवर जातो🥺 त्यालाही असतात नाती त्यालाही असतेच की ओढ घरच्यांची त्यालाही असतेच की गरज रोज रात्री आईच्या मांडीवर डोक ठेवून शांत झोपी जायची पण ह्या सगळ्या सुखसुविधा त्यागून तो करत असतो देशसेवा पूर्ण मनलावून आणी सर्वस्व देशाला अर्पवून...😇🤗 आरुला आता दादाच स्वप्न आणी देशसेवा याबाबत सगळं कळलं होत म्हणून ती म्हणाली "हो दादा तू पण जा आपल्या मातृभूमीसाठी लढायला आणी दुष्मणांना मारायला"... 👊🤞तीच हे बोलण एकूण तो जरा हसलाच आणी म्हणला "हो बाई नक्कीच जाईल"😊❤️
फक्त मी देशसेवक आहे मला वर्दी अंगावर चढवायची आहे हे म्हणूनच चालत नाही तर आपल्याला तसे आपले विचारही ठेवावे लागतील मग गरज पडलीच तर प्राणही देशासाठी अर्पवून टाकता यावा आणी आपलं सगळं जीवन हे देशसेवेसाठी देता यावं 🤗😎 शेवटी एवढंच म्हणेल "आरं दहा रुपयाच्या कफनात कोण बी गुंडाळून जातंय पण तिरंग्यात लिपटून जायची शानचं वेगळी असते"...🥺😎🇮🇳
# जगण फक्त मातृभूमीसाठी...😎🫡सर्व देशभक्तांना आणी वीर शहीद जवानांना समर्पित...🙏
✍प्रियंका भोसले....✍
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
BY ❤️शब्द मनाचे❤️
Share with your friend now:
tgoop.com/shabdamanache/7614